लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची नोंदणी न झाल्यास संबंधित शिक्षकांचे वेतन रोखण्याचा इशारा शिक्षण विभागाने १४ आॅगस्ट रोजी काढलेल्या परिपत्रकातून दिला आहे. सदर परिपत्रक रद्द करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्टÑ राज्य जिल्हा शाखा गडचिरोलीच्या पदाधिकाºयांनी दिला आहे. जिल्हाधिकाºयांच्या मार्फत शिक्षण मंत्र्यांना याबाबतचे निवेदन गुरूवारी पाठविले.निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील प्रवेशपात्र जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांचे अद्याप आधार नोंदणी झाली नाही. त्यांचे आधार काढण्याची जबाबदारी शिक्षकांकडे सोपविली आहे. शिक्षक आपले काम प्रामाणिकपणे करीत आहेत. सरल प्रणालीवर विद्यार्थ्यांची माहिती अपलोड केली जात आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नाही. त्या विद्यार्थ्याला आधार नोंदणी केंद्रावर शिक्षक कसा काय घेऊन जाईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने सदर परिपत्रक रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, प्रभाकर सोनडवले, गंगाधर मडावी, देवेंद्र डोहणे, प्रभाकर साखरे, राजेश खेवले, नामदेव बन्सोड, सिध्दार्थ गोवर्धन, दीपक भैसारे, नरेंद्र खेवले, सिध्दार्थ मेश्राम, धात्रक, भिष्मानंद दुधे उपस्थित होते.
आधार नोंदणी आदेश रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 12:18 AM
विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची नोंदणी न झाल्यास संबंधित शिक्षकांचे वेतन रोखण्याचा इशारा शिक्षण विभागाने १४ आॅगस्ट रोजी काढलेल्या परिपत्रकातून दिला आहे.
ठळक मुद्देशिक्षणमंत्र्यांना निवेदन : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मागणी