देसाईगंज : आरोग्य प्रबोधिनी संस्था व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने देसाईगंज येथे ४ फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. या निमिताने विद्यार्थ्यांना खर्रा व तंबाखूचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सादरीकरण व पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली तसेच जागतिक कर्करोग दिन पंधरवड्याचा शुभारंभ स्थानिक चौकात करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एन. आडे हाेते. मार्गदर्शक म्हणून आरोग्य प्रबोधिनीच्या डॉ. अर्चना गभने, आरती पुराम उपस्थित हाेते. प्रास्ताविक आर. एम. गोटमारे, संचालन व्ही. बी. वासनिक तर आभार आर. के. लोही यांनी मानले. यशस्वितेसाठी आर. एस. सोनेकर, व्ही. वाय. नागमोती, सी. आर. कावळे, ए. डब्लू. खोब्रागडे, एम. एस. जाधव. एम. एम. वल्के, जी. जे. ठाकरे, आर. बी. भोयर, ए. टी. करांकार, एम. के. वल्के, एस. पी. मेश्राम, डी. सी. बोलके यांनी सहकार्य केले.
औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत कर्कराेग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:32 AM