वैनगंगा नदीघाटावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू असताना एक कार संशयास्पद स्थितीत जात होती. त्यामुळे त्या कारला अडवून तपासणी केली असता कारच्या डिकीत १४ खरड्याचे बॉक्स आणि मागच्या सीटवर ४ खरड्याचे बॉक्स असे १८ बॉक्स देशी दारू होती. त्यातील प्रत्येक बॉक्समध्ये १०० सीलबंद निप होत्या. त्यांची एकूण किंमत ९० हजार रुपये आहे. दारू वाहतुकीसाठी वापरलेली अल्टो कार (एम.एच. ३३, ए १२९७) सुद्धा जप्त करण्यात आली.
कारमधील आरोपी काशीनाथ वासुदेव मानकर (रा. व्याहाळ बु.) आणि गणेश गोपाल भंडारे (रा.कोंडेखल, ता.सावली, जि.चंद्रपूर) या दोघांना अटक करण्यात आली.
गेल्या तीन दिवसांत गडचिरोली पोलिसांनी विविध कारवायांमध्ये देशी, विदेशी, हातभट्टीची दारू आणि वाहने मिळून ४ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईसाठी एएसआय प्रभाकर भेंडारे, हवालदार गजानन सहारे, खुशाल कोसनकर आदींनी सहकार्य केले.