शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

कारवाफा बिट विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:12 PM

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर शुक्रवारी पार पडलेल्या ......

ठळक मुद्देगडचिरोली प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा : भाडभिडीचा बिट उपविजेता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर शुक्रवारी पार पडलेल्या तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत कारवाफा बिटाने विजेतेपद पटकाविले तर भाडभिडी बिट उपविजेता ठरला. विजेता व उपविजेता संघाला चषक देऊन गौरविण्यात आले.समारोपीय कार्यक्रमाला पारितोषिक वितरक म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. विपीन इटनकर होते. अध्यक्षस्थानी सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार होते. विशेष अतिथी म्हणून वैैद्यकीय अधिकारी डॉ. शालिनी इटनकर, प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी ए. आर. शिवणकर, आर. के. लाडे, छाया घुटके, नोडल अधिकारी आर. टी. निंबाळकर, सोनसरीचे मुख्याध्यापक ए. के. इस्कापे, अधीक्षक के. एस. जावळे उपस्थित होते. आदिवासी खेळाडू क्रीडागुणांनी निपूण असून विभागीय, राज्य, राष्टÑीय, आंतरराष्टÑीय स्तरावर हे खेळाडू चमकावे, यासाठी आपण सहकार्य करू, असे आश्वासन प्रकल्प अधिकारी डॉ. इटनकर यांनी दिले.अहवालवाचन इस्कापे, संचालन विरूटकर व संदीप दोनाडकर तर आभार वंजारी यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुधीर शेंडे, अनिल सोमनकर, प्रमोद वरगंटीवार, वासुदेव कोडापे, मडावी, दब्बा, अलाम, कन्नाके, शोभा गेडाम, नीलू उसेंडी, गौरकार, मिसार, व्ही. जी. चाचरकर, गिरी, वंदना महल्ले, आय. एम. दोनाडकर, कटरे, हेडो, शंभरकर, मोटघरे, सतीश पवार, प्रेमिला दहागावकर, सुधीर झंझाळ, कोरचा, तुमसरे, बहिरवार, बावनथडे, कुमरे, नाईक, राठोड, बरडे, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांंनी सहकार्य केले.प्रकल्पस्तरीय विजेता व उपविजेताक्रीडा संमेलनात पाच बिटातील २४ शासकीय व १८ अनुदानित शाळांतील खेळाडूंनी भाग घेतला. या संमेलनात कारवाफा संघाने ३४३ गुण मिळवित विजेतेपद तर भाडभिडी संघाने २९७ गुण प्राप्त करीत उपविजेतेपद पटकाविले. कारवाफा बिटात कारवाफा, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही, गडचिरोली येथील शासकीय तर चांदाळा, गिरोला, गट्टा या अनुदानित आश्रमशाळाचा समावेश आहे. कारवाफा संघाने १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक, १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक, याच गटात खो- खो स्पर्धेत मुलींनी प्रथम क्रमांक पटकाविला.उपविजेता भाडभिडी संघाने १४ वर्ष वयोगटात मुला-मुलींच्या कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक, मुलांच्या व्हॉलिबॉल व मुलींच्या खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक, १७ वर्ष वयोगटात मुलींच्या खो- खो स्पर्धेत प्रथम क्रमांक, १९ वर्ष वयोगटात मुलांच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.