गडचिराेली : गंभीर स्थितीतील काेराेना रुग्णाची काळजी घेण्यासाठी एका नातेवाईकाला रुग्णाजवळ राहण्याची परवानगी दिली जाते. त्याला केअर टेकर असे संबाेधले जाते. हे केअर टेकर रुग्णालयातून थेट घरी येत असल्याने काेराेना संसर्गाचा धाेका वाढला आहे.
काेराेना हा संसर्गजन्य राेग असल्याने काेराेना वाॅर्डात रुग्ण व आराेग्य कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही. एखाद्या रुग्णाची तब्बेत गंभीर असल्यास रुग्णाची काळजी घेण्यासाठी एका नातेवाईकाला राहण्याची परवानगी आराेग्य विभागामार्फत दिली जाते. केअर टेकर हा काेराेना वाॅर्डातच रुग्णासाेबतच राहत असल्याने काेराेना प्रतिबंधाचे सर्व नियम त्याने पाळणे आवश्यक आहे. मात्र, काही केअर टेकर दरदिवशी घर ते दवाखाना ये-जा करी आहेत तसेच खुलेआम बाहेरही फिरत आहेत. बाजारपेठेत जाऊन विविध वस्तू खरेदी करतात. या केअर टेकरमुळे परिसरातील इतर नागरिकांना काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या केअर टेकरच्या बाहेर निघण्यावर तसेच घरी येण्यावर प्रतिबंध घालण्याची गरज आहे.
बाॅक्स...
हातावर शिक्का मारावा
बाहेरजिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तीवर ज्याप्रमाणे हाेम क्वाॅरंटाईनचा शिक्का मारला जाते, त्याचप्रमाणे केअर टेकर असलेल्या व्यक्तींच्या हातावरही अशाप्रकारचा शिक्का मारण्याची गरज आहे. जेणेकरून हा व्यक्ती इतर नागरिकांच्या संपर्कात आल्यास त्याची ओळख पटण्यास मदत हाेईल तसेच या व्यक्तींच्या बाहेर निघण्यावर आराेग्य विभागाने प्रतिबंध घालण्याची गरज आहे. वाॅर्डाच्या बाहेर जात असल्यास त्या वेळेची नाेंद करावी, तसेच काेणत्या कारणासाठी ताे बाहेर जात आहे, याची नाेंद करावी, असे झाल्यास त्यांच्या फिरण्यावर प्रतिबंध येईल.