लस घेतली की किमान अर्धा तास केंद्रातच थांबा, असे शासन व प्रशासनाच्या वतीने वारंवार जाहीर करण्यात आले आहे. त्यामागे कारण आहे. लस घेतल्यावर काही जणांना रिॲक्शन हाेण्याची भीती असते. अशावेळी संबंधित व्यक्ती केंद्रात राहिली तर केंद्रातील डाॅक्टर, परिचारिका लगेच धावपळ करून त्यांच्यावर औषधाेपचार करू शकतील. परंतु लस घेतल्यानंतर व्यक्ती लगेच निघून गेला आणि त्याला रस्त्यात पुरळ आली, रिॲक्शन झाले तर परिणामी प्रकृती बिघडून जीवाचे बरे वाईट होण्याची भीती असते. त्यामुळेच लस घेतल्यानंतर व्यक्तीला किमान अर्धा तास केंद्रात राहण्यास सांगितले जाते. तेव्हा संबंधितांनी याची काळजी घ्यावी, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
बॉक्स......
लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?
लसीकरणानंतर अर्धा तास ठेवण्याच्या मागचे कारण म्हणजे कुणाला चक्कर येऊ शकते. कुणाला रिॲक्शन होऊ शकते. कुणाला पुरळ येऊ शकते. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा तास त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवावे लागते. लसीकरण केल्यानंतर त्या केंद्रावर असलेल्या आसन व्यवस्थेत किमान अर्धा तास थांबणे गरजेचे आहे. काही गंभीर दुष्परिणाम याच काळात समोर येतो. या ठिकाणी डॉक्टर, या दुष्परिणामावरील इंजेक्शन, ऑक्सिजन, रुग्णवाहिका अशी सर्व प्रकारची व्यवस्था असते. त्यामुळे थेट घरी न जाता थांबणे आवश्यक आहे.
बाॅक्स .......
लस हेच औषध
कोरोनावर अजूनही कोणतेच औषध सापडले नाही. सध्या तरी लस हाच पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे. आता ३० वर्षापुढील सर्वांनाच लस दिली जात असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, असे आराेग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
काेट ....
लगेच घरी जाऊ नये
नागरिकांनी काेविड लस घेतल्यावर किमान अर्धा तास केंद्रावर थांबले पाहिजे. दुर्दैवाने काही दुष्परिणाम जाणवले तर लागलीच त्यावर उपाय करणे शक्य आहे. आजपर्यंत कोणाला दुष्परिणाम आढळले नाहीत. - डाॅ. समीर बन्साेडे, जिल्हा माता व बाल संगाेपन अधिकारी, गडचिराेली
बाॅक्स .....
जिल्ह्यात आजपर्यंत झालेले लसीकरण - १३,८२५
पहिला डोस - ९,७१८
दुसरा डोस - ६,६७१
एकूण केंद्र - ७२
३० ते ४० साठी केंद्र - २५