काेराेना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर बाधितांना काेरची येथील काेविड केअर सेंटरमध्ये दहा दिवसांसाठी ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक घाबरून कोरोना चाचणी करण्यासाठी समोर येत नव्हते. शहरातील चौकात व वाॅर्डांमध्ये प्रशासनाच्या वतीने आरोग्य शिबिर लावून कोरोना चाचणीस सुरुवात करण्यात आली. तीन दिवसांत ३६१ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५३ नागरिक बाधित आढळून आले. कोरची शहरातील वाॅर्ड क्रमांक ३, ४ व ६ मध्ये शिबिर घेण्यात आले. मात्र सुरुवातीला एकही नागरिक पुढे येत नव्हते. नगरपंचायतचे कर्मचारी, पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन संशयितांना चाचणी करण्यासाठी शिबिरात घेऊन आले. तेव्हाच चाचणी झाली. २४ एप्रिल राेजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ९१ नागरिकांची चाचणी केली असता १६ नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. काेराेनाबाधितांच्या वाॅर्डांमध्ये नगरपंचायतने निर्जंतुकीकरण केले आहे.
या वेळी नायब तहसीलदार बी.एन. नारनवरे उपस्थित होते. बोटेकसा आरोग्य केंद्रांतर्गत १ हजार २६५ लाेकांची चाचणी केली असून त्यामध्ये ९५ लोक पॉझिटिव्ह तर कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५९२ नागरिकांची तपासणी केली असून ८५ लोक पॉझिटिव्ह निघाले तर कोरची ग्रामीण रुग्णालयांतर्गत ५ हजार ४४९ नागरिकांची कोरोना चाचणी केली असता ४१३ नागरिक पॉझिटिव्ह निघाले. सध्या काेरची येथील काेविड केंद्रात एकूण ९० ॲक्टिव्ह रुग्ण भरती आहेत. नगरपंचायतचे उपमुख्याधिकारी बाबासो हाक्के, नायब तहसीलदार बी.एन. नारनवरे, लिपिक प्रांजली मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव लेपसे, हेल्थ वर्कर स्वप्निल गोमासे, एमपीडब्ल्यू खुणे, एमएनडी सय्यद, नीलेश सूर्यवंशी, अनिकेत भांडारकर, माजी नगराध्यक्ष नसरुद्दीन भामानी उपस्थित होते.
===Photopath===
240421\24gad_11_24042021_30.jpg
===Caption===
काेरची येथे काेराेना चाचणीसाठी उपस्थित नागरिक.