शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

गडचिरोलीत 'माया' जमविणाऱ्या पालघरच्या 'आरएफओ'वर गुन्हा

By संजय तिपाले | Published: September 20, 2024 7:01 PM

पत्नीही आरोपी : आढळली ६६ लाख रुपयांची असंपदा, 'एसीबी'कडून घरझडती

गडचिरोली: गडचिरोलीत दहा वर्षे सेवा करणाऱ्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यास सहकारी महिला कर्मचाऱ्याकडून पावणे दोन लाखांची लाच स्वीकारताना अटक केली होती. उघड चौकशीत त्याने मोठ्या प्रमाणात गैरमार्गाने 'माया' जमविल्याचे स्पष्ट झाले. अखेर २० सप्टेंबरला त्याच्याविरुध्द असपंदेचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्याच्या पत्नीलाही आरोपी केले आहे. दिवाकर रामभाऊ कोरेवार असे त्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव असून तो सध्या पालघरच्या पाली (ता. वाडा) वनविभागात कार्यरत आहे.

दिवाकर कोरेवार हा वडसा वनविभागात वनपरिक्षेत्र  अधिकारी म्हणून कार्यरत होता. सहकारी महिला कर्मचाऱ्याकडून पावणे दोन लाख रुपयांची लाच घेताना त्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी २०२० मध्ये कोरची पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, पो.नि.शिवाजी राठोड यांनी या गुन्ह्याच्या तपासात त्याची उघड चौकशी केली. यामध्ये त्यास सुमारे ६६ लाख ८ हजार ४०४ रुपयांच्या मालमत्तेचे विवरण देता आले नाही. कायदेशीर उत्पन्नापेक्षा अधिक आढळलेली ही संपत्ती जमविण्यात पत्नी पार्वती कोरेवार हिनेही साथ दिल्याचे निष्पन्न झाल्याने दाम्पत्यावर गडचिरोली ठाण्यात कलम १३ (१) (अ) (ब), १३ (२), १२ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.  यानंतर उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले , पो.नि. शिवाजी राठोड, संतोष पाटील, सहायक उपनिरीक्षक सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, राजेश पद्मगीरवार, किशोर जोजारकर, पो.ना. स्वप्नील बांबोळे, अंमलदार संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके , विद्या म्हशाखेत्री, ज्योत्सना वसाके, प्रफुल्ल डोर्लीकर यांनी शहरातील रामनगर येथील त्याच्या बंगल्यावर धाड टाकून चित्रीकरणात झडती घेतली. 

"दहा वर्षांच्या कार्यकाळात संबंधितांनी असंपदा जमविल्याचे समोर आले आहे. घर झडतीत मालमत्तेबाबत नवीन काही आढळून आले नाही.त्यांना नोटीस बजावली असून एसीबी कार्यालयात १५ दिवसांच्या आत हजर राहण्यास सांगितले आहे." - चंद्रशेखर ढोले, उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली

गडचिरोलीत बंगला, प्लॉट, सासरवाडीत शेतीदरम्यान, १९९५ मध्ये वनरक्षक म्हणून रुजू झालेल्या दिवाकर कोरेवार याने वनपरिक्षेत्र अधिकारीपदापर्यंत मजल मारली. २०११ ते २०२० दरम्यान गडचिरोलीत सेवा बजावताना त्याच्या मालमत्तेत वाढ ८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. यातून त्याने गडचिरोलीत आलिशान बंगला, प्लॉट अन् मूल (जि. चंद्रपूर) येथे सासरवाडीत शेती खरेदी केल्याचेही निष्पन्न झाले. या सर्व मालमत्तेचा हिशेब त्यास देता आला नाही, त्यामुळे त्याच्यावर असंपदेचा गुन्हा नोंदविण्यात आला. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारGadchiroliगडचिरोलीforest departmentवनविभाग