लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : १६ जानेवारी २०१९ रोजी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर एटापल्लीपासून सात किमी अंतरावर गुरूपल्ली-कर्रेम दरम्यान आलापल्लीकडे जाणाऱ्या बसला विरूध्द दिशेने येणाºया ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्यासह बसमधील चार प्रवासी जागीच ठार झाले तर अनेक प्रवासी जखमी झाले. या अपघात प्रकरणी एटापल्ली पोलिसांनी ३० ते ४० इसमांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या आरोपींना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.सदर अपघात सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाºया ट्रकमुळे हा अपघात घडला. त्यामुळे सुरजागड प्रकल्प व लोहखनिज वाहतुकीला विरोध करीत लोकांनी सुरजागड पहाडावरील तब्बल १५ ट्रक जाळले. तसेच सात ट्रकच्या काचा फोडल्या. एटापल्ली येथे दोन दिवस मोठे आंदोलन करण्यात आले. अपघातात ठार झालेले वनपाल प्रकाश अंबादे यांचा मृतदेह आंदोलनस्थळी तब्बल ३० तास ठेवण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार दीपक आत्राम यांनीही आंदोलनाला पाठींबा दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना लायड्स मेटल कंपनीकडून २५ लाख रूपयांची मदत मिळवून देऊन, कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपावर नोकरी देणार, सुरजागड पहाडीवरील लोहदगडाची वाहतूक बंद करू, एटापल्ली-आलापल्ली या नवीन रोडचे काम आठ दिवसात सुरू करू, असे नानाविध आश्वासने दिली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सदर ट्रक जाळपोळ प्रकरणी एटापल्ली पोलीस ठाण्यात ३० ते ४० अज्ञात इसमाविरोधात भादंविचे कलम ४३५, ४२७, ३४१, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीची ओळख पटविणे सुरू असून आरोपींना केव्हाही अटक होऊ शकते. सदर प्रकरणातील आरोपींची संख्या वाढणार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर प्रकरणाचा तपास एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी व ठाणेदार सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक संजय राठोड करीत आहेत.
ट्रक जाळणाऱ्या इसमांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 1:03 AM
१६ जानेवारी २०१९ रोजी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर एटापल्लीपासून सात किमी अंतरावर गुरूपल्ली-कर्रेम दरम्यान आलापल्लीकडे जाणाºया बसला विरूध्द दिशेने येणाºया ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्यासह बसमधील चार प्रवासी जागीच ठार झाले तर अनेक प्रवासी जखमी झाले.
ठळक मुद्देगुरूपल्ली अपघात प्रकरण : आरोपींना केव्हाही अटक होणार