विविध कार्यक्रम : शिवाजी विज्ञान महाविद्यालय व किसान विद्यालयात आयोजनगडचिरोली : बँक आॅफ महाराष्ट्रच्या वतीने शहरातील शिवाजी विज्ञान महाविद्यालयात व नेहरू युवा केंद्राच्या वतीने तालुक्यातील जेप्रा येथील किसान विद्यालयात सोमवारी हिंदी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त स्त्री भ्रुणहत्या, दुर्घटना, पर्यावरण व प्रदूषण या विषयावर घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ६७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी प्राचार्य जयंत भिलकर होते. प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापक शांतिलाल सेता, उपमुख्याध्यापक वाय. आर. मेश्राम, सुधा सेता, संजय निशाने, सूर्यवंशी, जे. आर. मडावी, वंदना भोयर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. जेप्रा येथील किसान विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओ. आर. रडके होते. प्रमुख अतिथी म्हणून जी. एम. चापले, एस. बी. म्हशाखेत्री, जगताप, पोलीस पाटील खिमदेवी चुधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली. भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक सुरज गावतुरे, द्वितीय क्रमांक सोनम राऊत, निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक रिना लेनगुरे, द्वितीय क्रमांक रोहिणी गावतुरे यांनी पटकाविला. विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी प्रमोद भोयर यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
गडचिरोली व जेप्रा येथे हिंदी दिन साजरा
By admin | Published: September 16, 2015 1:54 AM