गडचिराेली : तालुक्याच्या कणेरी येथील प्रियंका हायस्कूल तथा कनिष्ठ कला महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून रविवारी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय नार्लावार हाेते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सहसचिव चंदा निखारे, शिक्षक डी. के. कांबळे, राजेश निखारे, आर. ए. बैस, पी. डब्ल्यू. चुधरी, के. आर. पिलारे, प्रा. ए.टी. गंडाटे, प्रा. सी.एस. हुलके, शरद गायकवाड उपस्थित हाेते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर मनाेगत व्यक्त केले, तसेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनीही मनाेगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन तन्वी, चुनारकर, तर दीप्ती साेनुले हिने आभार मानले.
जि. प. प्राथमिक शाळा साखरा
गडचिराेली : तालुक्याच्या साखरा येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने स्वयंशासन उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित हाेते.
गुरुदेव याेग शिक्षण व सेवा समिती
गडचिराेली : श्री गुरुदेव योग शिक्षण व सेवा समितीतर्फे रविवारी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. सर्वप्रथम ज़िल्हा प्रचारक प्रवीण मुक्तावरम यांनी डाॅ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन केले व त्यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. याप्रसंगी ज्ञानेश्वर बम्बल, कुशल काळबांडे, आभास काळबांडे, हर्ष भांडेकर, प्रीती मुक्तावरम, कुसुम मुक्तावरम उपस्थित होते.
शंकरराव मल्लेलवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय बोदली : येथे ५ सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य मनीष शेटे, मनोज हुलके, सुभाष कावळे, सुनील कामडी, जालेंद्र सोरते, रमेश लोणारे, अर्चना राऊत, वर्षा मने, गीता धाईत, संजय मल्लेलवार, सोमनकर, कालीदास भांडेकर, देवेंद्र सजनपवार व देवेंद्र दंडीकवार उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र तेलंग यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.