देसाईगंजात विविध स्पर्धा : विजेत्यांना बक्षीस वितरण लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : सीआरपीएफ १९१ बटालीयनचा स्थापना दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले. नक्षलवादाचे संमूळ उच्चाटन करण्यासाठी व जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी देसाईगंज येथे १७ जून २००९ रोजी सीआरपीएफ १९१ बटालीयनची स्थापना करण्यात आली. जनतेच्या विकासकार्यात अडसर ठरलेल्या विघातक कृतींचा बिमोड करून जनतेला हव्या असलेल्या योजना कार्यान्वित करण्यासाठी बटालीयनचा पूर्ण सहभाग राहिला आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने पोलीस जवानांनी नगर परिषदेच्या स्टेडियमवर कार्यक्रम आयोजित करून वेगवेगळ्या कवायती केल्या व शस्त्रांची माहिती दिली. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गीतगायन, गोंडीनृत्य सादर करण्यात आले. नृत्य व गीतगायन स्पर्धेतील विजेत्यांचा सीआरपीएफ कमांडंट प्रभाकर त्रिपाठी यांच्या हस्ते बक्षीस व प्रशस्तीपत्र गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला उपकमांडंट पी. के. मिश्रा, संजय शर्मा, अजित उपाध्याय, वैैद्यकीय अधिकारी डॉ. नीतेश परचाके, ग्रामीण रूग्णालयाचे वैैद्यकीय अधीक्षक डॉ. सहारे, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तैैमुर मुलानी, नगराध्यक्ष शालू दंडवते उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जवानांनी सहकार्य केले.
सीआरपीएफचा वर्धापन दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2017 1:17 AM