आॅनलाईन लोकमतगडचिरोली : देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची जयंती रविवारी जिल्हाभर विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, गडचिरोली - स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी होते. उपस्थित मान्यवरांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष शंकर सालोटकर, महासचिव प्रभाकर वासेकर, समशेर खॉ पठाण, शहर अध्यक्ष सतीश विधाते, लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, ओबीसी सेलचे पांडुरंग घोटेकर, सोशल मीडिया सेलचे नंदू वाईलकर, देवाजी सोनटक्के, नेताजी गावतुरे, एजाज शेख, पी. टी. मसराम, तुळशीदास भोयर, बाशीद शेख, आरिफ कनोजे, सी. बी. आवळे, पंडित पुडके, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड, रजनीकांत मोटघरे, सरोजित बिश्वास, रॉबीन मंडल, सदाम शेख, अरबाज शेख, रामचंद्र गोटा, आशिष कन्नमवार, कुमदेव कोटगले, रंजीत म्हशाखेत्री, काशिनाथ गुरनुले व कार्यकर्ते उपस्थित होते.महिला काँग्रेस, गडचिरोली - स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, तालुकाध्यक्ष ज्योती गव्हाणे, उपाध्यक्ष वर्षा कुलदेवकर, कल्पना नंदेश्वर, सपना गलगट, माधुरी कुसराम, निशा गेडाम, आरती कंगाली, संगीता सोनुले, कविता ठाकरे, सुजाता जुरेशिया, कलिंदा शेंडे, दिशा वासनिक, देवला शेंडे, फरीदा सय्यद, सुलोचना गेडाम, अंजली राऊत, गीता बोरकर, मीनाक्षी चहांदे, भाग्यश्री गेडाम व काँग्रेसच्या सदस्य उपस्थित होत्या.जिजामाता मुलींचे वसतिगृह, गडचिरोली - स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला वसतिगृहाच्या अधीक्षिका रजनी पोटे उपस्थित होत्या. या कार्यक्रमात उपस्थितांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. संचालन भावना लांजेवार यांनी केले. यशस्वीतेसाठी करिश्मा मसराम यांनी सहकार्य केले.राष्टÑवादी काँग्रेस पार्टी, गडचिरोली - स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला अध्यक्ष सोनाली पुण्यपवार, प्रा. रिंकू पापडकर, प्रभाकर बारापात्रे, अशरफ मुस्ताक शेख, विनायक झरकर, फहीम काझी, लतीफ शेख, कबीर शेख, संजय चुधरी, तुकाराम पुरणवार, मनय्या कालवा, विजय चंदूलवार व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली.तालुका काँग्रेस कमिटी कार्यालय, आरमोरी - स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. आनंदराव गेडाम होते.प्रमुख अतिथी म्हणून तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किशोर वनमाळी, पं. स. सभापती बबीता उसेंडी, जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, माजी सभापती अशोक वाकडे, माजी उपसभापती चंदू वडपल्लीवार, प्रा. गौतम, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, राजू गारोदे, अशोक भोयर, मंगरू वरखडे, कमलेश खानदेशकर, दामले, अंकूश गाढवे, जीवन उसेंडी, प्रभूदास गायकवाड, गोपाल सुतारे, चंद्रशेखर काळबांधे हजर होते.