फाेटाे
गडचिराेली : आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बाेस यांची जयंती शनिवार २३ जानेवारीला जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली.
श्री. जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे महाविद्यालय धानाेरा : राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्या वतीने सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ वीणा जंबेवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजू किरमिरे, डॉ. हरीष लांजेवार, डॉ. पंढरी वाघ,डाॅ. डी. बी. झाडे, रासेयो विभाग प्रमुख डॉ. सोनाली ढवस आदी उपस्थित होते. याप्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. गणेश चुदरी तर आभार प्रा. मांतेश तोंडरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. नानाजी गोहणे, डॉ. सचिन धवनकर, प्रा. नितेश पुण्यप्रेड्डीवार, प्रा. प्रशांत वाळके, प्रा. प्रियंका पठाडे, प्रा. दादाजी ढाकडे, प्रा. विनाेद खोब्रागडे, प्रा. निवेदिता वटक यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय चामाेर्शी : येथील राष्ट्रीय सेवा याेजना विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बाेस यांची जयंती शनिवारी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. डी. जी. म्हशाखेत्री हाेते. उपस्थित मान्यवरांनी नेताजी सुभाषचंद्र बाेस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी रासेयाे कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. राजेंद्र झाडे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. वंदना थुटे, डाॅ. भूषण आंबेकर, प्रा. डाॅ. रमेश बावणे, प्रा. दीपक बाबनवाडे, मेघा पत्रे, चंद्रकांत राठाेड, रवींद्र कऱ्हाडे, देवाजी धाेडरे, तुळशीराम जनबंधू उपस्थित हाेते.
शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चामाेर्शी : येथे नेताजी सुभाषचंद्र बाेस यांची जयंती शनिवारी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्राचार्य आनंदराव गेडाम, उपप्राचार्य सी. बी. किरमे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित हाेते. उपस्थित मान्यवरांनी नेताजी सुभाषचंद्र बाेस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
श्री. सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी : येथे नेताजी सुभाषचंद्र बाेस यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डाॅ. पंकज चव्हाण हाेते. चव्हाण यांनी नेताजी सुभाषचंद्र बाेस यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. यावेळी प्रा. डाॅ. रमेश साेनटक्के, डाॅ. अपर्णा मारगाेनवार, डाॅ. एम.पी.सिंग, डाॅ. प्रदीप कश्यप, डाॅ. पी.के. सिंह, डाॅ. दीपक नागापुरे, डाॅ. प्रकाश राठाेड, प्रा. सुबाेध साखरे, प्रा. महेश सिल्लमवार, प्रा. सचिन मुरकुटे, प्रा. जया राेकडे, प्रा. कवेंद्र साखरे, प्रा. राहूल आवारी, अरविंद थुटे, राकेश बाेगिरवार, शुभांगी डाेंगरे, विजय खाेब्रागडे, अविनाश जिवताेडे, देविदास किवे, रमेश वागदरकर उपस्थित हाेते.