कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणाविषयी जनजागृती, तसेच ग्रामस्वच्छता करणारे कर्मयोगी गाडगेबाबा हे महान संत होते. गाडगेबाबांचा आदर्श डाेळ्यासमाेर ठेवून शासनाने स्वच्छता अभियान सुरू केले. संत गाडगेबाबा यांचे याेगदान फार माेठे आहे, असे प्रतिपादन भाजप अनुसूचित माेर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम यांनी केले. समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल वरघंटे म्हणाले, संत गाडगेबाबा यांनी १९०८मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधला, १९२५ मध्ये गोरक्षण सेवा सुरू केली. पंढरपूरला चोखामेळा धर्मशाळा सुरू केली. कुष्ठराेग्यांसाठी सेवा केंद्र, दवाखाने, अन्नदान केंद्र, आश्रम अशा सेवा गरिबांसाठी उपलब्ध केल्या. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. संचालन अनिल माेते तर आभार प्रतीक सेलूकर यांनी मानले.
यावेळी रमेश गड्डमवार, सरपंच बाबुराव गट्टिवार, किशोरी मोते, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नगरसेविका रोशनी वरघंटे, संजयजी लोणारे, नितेश गट्टिवार, सुधीर गडपायले, शंकरजी श्रीसागर, राजेश मानपल्लीवार, माया ताजणे, प्रा.ज्योती सेलूकर, मंदा वरघंटे, तालुकाध्यक्ष रामेश्वर मेश्राम, सोनी गट्टिवार, दत्तूजी केळझरकर, विलास केळझरकर, पिंकी गडपायले, रागिणी वाकुडकर, कवडू गट्टिवार, प्रमोद वाकुडकर, संजय राजकोंडावार, राजू कोल्हटवार, राकेश माथनकर, बंडू पेंदोर, ललिता गडपायले, माया गड्डमवार, संजय माथनकर, सुभाष फाले, गजानन मानपल्लीवार, मुकेश गंडमवार, अशोक गंडमवार उपस्थित होते.