अहेरी नगर पंचायत क्षेत्रांतर्गत येत असलेल्या प्रभाग क्र. १६ चेरपल्ली येथे बाबुराव सुनतकर यांच्या घरापासून ते ईश्वर तलांडे यांच्या घरापर्यंत सीसी रोडचे बांधकाम सुरू आहे. मात्र या बांधकामात ४० एमएम गिट्टीऐवजी ६० एमएम चुरी गिट्टीचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. तसेच मातीमिश्रित रेतीचा वापर केला जात आहे. या कामाकडे अहेरी नगर पंचायतीचे अभियंता दुर्लक्ष करीत असल्याने कंत्राटदाराचे फावले आहे. त्यामुळे हे काम जास्त दिवस टिकणार की नाही, याबाबत नागरिकांमध्ये शंका आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करावी; तसेच अभियंता व संबंधित कंत्राटदारावर कठाेर कारवाई करावी,अशी मागणी आशिष सुनतकर, अजय रामटेके, दीपक सुनतकर, लक्ष्मण वेलादी, संतोष दुर्गे, अमोल रामटेके, अरुण सुनतकर, सोना सुनतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
110921\1658-img-20210911-wa0004.jpg
चेरपल्ली येथे सुरु असलेले सीसी रोड निकृष्ट दर्जाचे, ग्रामस्थांनी केलीनिवेदनाद्वारे जिल्हाधिकारीकडे तक्रार