वर्कऑर्डर दिल्याला आता वर्षभराचा कालावधी उलटत चालला आहे. वर्षभरात आरएमसी प्लांट का उभारला नाही, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. आरएमसी प्लांटशिवाय साध्या मिक्सर मशीनने सिमेंट काॅंक्रिट टाकण्याचा प्रयत्न कंत्राटदाराने केला हाेता. मात्र काही नागरिकांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी आरएमसी प्लांट टाकणे संबंधित कंत्राटदाराला सक्तीचे केले. या कामात अक्षम्य दिरंगाई हाेत असताना बांधकाम विभागाचे अभियंते चूप आहेत. यावरून बांधकाम विभागाचे अभियंते व कंत्राटदार यांच्यामध्ये मिलीभगत असल्याचा आराेप नागरिकांकडून केला जात आहे. आरएमसी प्लांट नसताना संबंधित कंत्राटदाराला कसा काय कंत्राट मिळाला, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहेत. १७ मार्च राेजी संबंधित कंत्राटदाराला बांधकाम विभागाने नाेटीस बजाविली. याला आता १५ दिवसांचा कालावधी उलटला आहे. बांधकाम विभागाने काेणती कारवाई केली, याबाबत विचारणा करण्यासाठी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता साखरवाडे व उपविभागीय अभियंता रवी टेंभुर्णे यांना फाेनवरून संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
बाॅक्स ....
इंदिरानगरातील बेडचा निघताहे धूळ
इंदिरा नगरातील चांगला डांबरी मार्ग फाेडून त्यावर गिट्टी व मुरूम टाकले. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर महिनाभरापूर्वी सिमेंट काॅंक्रिटचा बेड टाकण्यात आला आहे. याला आता महिना उलटत आहे. इंदिरानगरातील हा मुख्य मार्ग असल्याने याच मार्गावरून आता ट्रॅक्टर, ट्रक व इतर वाहने ये-जा करीत आहेत. महिनाभराच्या वर्दळीमुळे बेड उखडत चालला आहे. काही ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत. कंत्राटदाराने टाकलेले पाेत्यांचे तुकडे झाले आहेत. तर तणीस बारीक हाेऊन उडून गेली आहे. अशी बेकार अवस्था या मार्गाची झाली आहे. संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी इंदिरानगरातील नागरिकांनी केली आहे.