आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यातील हेमलकसा येथे असलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांची केंद्रीय प्राणी कल्याण मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे सचिव एम.रवीकुमार (आयएफएस) यांनी सोमवारी या नियुक्तीचे पत्र आमटे यांना पाठविले.रमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित असलेल्या डॉ.आमटे यांनी १९७३ मध्ये अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे वास्तव्यास येऊन वाघ, बिबट, अस्वल अशा हिंस्त्र प्राण्यांबरोबरच विषारी सापांनाही आश्रय दिला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांना लोकबिरादरीत असलेल्या वन्यप्राण्यांना जंगलात सोडण्याचे निर्देश वनविभागाकडून मिळाले होते. त्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत दिल्लीत जाऊन वनमंत्र्यांची भेट घेतली होती.
केंद्रीय प्राणी कल्याण मंडळावर डॉ. प्रकाश आमटे यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:31 AM
जिल्ह्यातील हेमलकसा येथे असलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांची केंद्रीय प्राणी कल्याण मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्देमंडळाचे सचिव एम. रवीकुमार यांचे पत्र