केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:37 AM2018-05-27T01:37:42+5:302018-05-27T01:37:53+5:30

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने २६ मे रोजी चार वर्षे पूर्ण केली. परंतु निवडणुकीपूर्वी दिलेली एकही आश्वासन सरकारने या चार वर्षात पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून महागाई वाढविली, असा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी करण्यात आला.

The central government fails on all fronts | केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

Next
ठळक मुद्देकाँग्रेसतर्फे विश्वासघात दिवस : पेट्रोल, डिझेल दरवाढीसह महागाई वाढविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने २६ मे रोजी चार वर्षे पूर्ण केली. परंतु निवडणुकीपूर्वी दिलेली एकही आश्वासन सरकारने या चार वर्षात पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून महागाई वाढविली, असा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी करण्यात आला.
केंद्र सरकारची चार वर्ष पूर्ण झाल्याच्या विरोधात काँग्रेसतर्फे शनिवारी विश्वासघात दिवस पाळून स्थानिक इंदिरा गांधी चौकात सरकारविरोधी निदर्शने करण्यात आली. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ याप्रसंगी दुचाकीला हार टाकून सरकारचा निषेध करण्यात आला. चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी लोकांना भरपूर स्वप्ने दाखविली. जनतेनेही त्यांना मोठ्या प्रमाणावर मते देऊन सत्तेवर काबीज केले. सत्तेवर आल्यावर दिलेली आश्वासने पूर्ण करतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वासघात केला. मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कारभाराचा पंचनामा जनतेसमोर मांडू, असेही जिल्हा काँग्रेसने म्हटले आहे.
परदेशातून १०० दिवसांत काळा पैसा आणू व सर्वांच्या खात्यात १५ लाख देऊ, असे आश्वासन निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु आज ४८ महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु काळा पैसा आला नाही. उलट निरव मोदी यांच्यासारख्या लोकांनी देशातील सफेद पैसा घेऊन परदेशात पळ काढला. हा विश्वासघात नाही तर काय, असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला. आंतरराष्टÑीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना सरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवून २५ टक्के वॅटच्या माध्यमातून १७ लाख कोटी रूपये जनतेच्या खिशातून काढून घेतले. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला सरकारकडे पैसा नाही. उलट १२ उद्योगपतींचे २ लाख ४१ हजार कोटी रूपये माफ करण्यात आले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोदी सरकारने कृषी क्षेत्रात कर लावला आहे. हा विश्वासघात नाही तर काय असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.
केंद्र शासनाचा निषेध करताना जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश ताकसांडे, समशेर खॉ पठाण, प्रभाकर वासेकर, पंकज गुड्डेवार, सतीश विधाते, नंदू वाईलकर, रजनीकांत मोटघरे, डी.डी. सोनटक्के, पी.टी.मसराम, हरबाजी मोरे, अधिर इंगोले, एजाज शेख, प्रभाकर बारापात्रे, तुकाराम पुरनवार, विवेक ब्राह्मणवाडे, नेताजी गावतुरे, महादेव भोयर, बाबुराव बावणे, सोनाली पुण्यपवार, नीलिमा राऊत, लता ढोक, पूजा अहिरे, तुळशिदास भोयर, कमलेश खोब्रागडे, मिलींद बागेसर, प्रतीक बारसिंगे, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, प्रकाश मोहुर्ले, वैभव कळस्कर, कल्पक मुपिडवार व काँग्रेस, राकाँ कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The central government fails on all fronts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.