मागील काही महिन्यांपासून देशात सातत्याने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर आदी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल, डिझेलचे दर शतक पार केले आहेत. याचा परिणाम इतर व्यवसायावर झाला. कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. यातच महागाई वाढली असल्याने सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दळणवळणाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना कमालीचा आर्थिक फटका बसत आहे. या आंदोलनात जिल्हा काेषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, काँग्रेस उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, युवक काॅंग्रेसचे प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, एजाज शेख, महासचिव समशेरखा पठाण, सेवादलाचे तालुकाध्यक्ष सुभाष घाईत, रोजगार स्वयंरोजगार सेलचे अध्यक्ष काशिनाथ भडके, बाळू मडावी, राकेश रत्नावार, मनोहर चलाख, रामदास टिपले, अनिल कोठारे, तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, महासचिव घनश्याम वाढई, लहुकुमार रामटेके, शंकर डोंगरे, दिवाकर निसार, ढिवरु मेश्राम, तुळशिराम भोयर, आरिफ कनोजे, मिलिंद बागेसर, बाशिद शेख, जिशान शेख, आशिष वाढई, जय चौधरी, आकाश बोलुवार, आलोक गांगरेड्डीवार, वसंत राऊत, कपिल बारसिंगे, किशोर चापले, निखिल खोब्रागडे, प्रतीक बारसिंगे, मिथुन गेडाम, कल्पक मुपीडवार, बबलू कोतकोंडावार, विक्की निकोसे, स्वप्नील घोसे, सोनू म्हशाखेत्री, रेहान शेख व कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
बाॅक्स
केंद्र सरकारविराेधात घाेषणाबाजी
महागाईचा निषेध म्हणून शनिवारी जिल्हा मुख्यालयातील धानोरा मार्गावरील पेट्रोल पंपापासून ते चंद्रपूर मार्गावरील डाेंगरे पेट्रोलपंपापर्यंत कॉंग्रेस कमिटीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविराेधात घोषणाबाजी केली. अनेक नारे व घाेषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. वाढलेले दर त्वरित मागे घेण्यात यावे, अशी मागणी केली.
110721\11gad_1_11072021_30.jpg
सायकल रॅलीत सहभागी झालेले काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते.