लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी एटापल्ली तालुक्याच्या अतिदुर्गम तोडसा भागात शनिवारी दौरा करून तेथील वनराई बंधारा कामाची पाहणी केली. तसेच आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्याच्या समस्याही जाणून घेतले.तोडसा ग्रामपंचायती अंतर्गत लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. या भागामध्ये ३० पेक्षा अधिक बंधाºयाचे काम झाले आहे. तोडसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधी कक्ष, प्रसुती गृह, रक्त तपासणी कक्ष, शल्यगृह कक्ष आदींची डॉ. राठोड यांनी पाहणी केली. त्यानंतर आस्थापना विभागात जाऊन रेकॉर्डची पाहणी केली. कुपोषणाचा आढावाही त्यांनी घेतला. त्यानंतर डॉ. राठोड यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला आकस्मिक भेट दिली. येथे पेसा अबंध निधीच्या रेकॉर्डची पाहणी केली. तेंदूपत्ता संकलन करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले.गावातील शौचालय व घरकूल बांधकामाची त्यांनी तपासणी केली. नरेगा योजनेतून सर्वांना शोषखड्डे बांधकाम मंजूर करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी त्यांच्यापुढे मांडली. याप्रसंगी सरपंच प्रशांत आत्राम, गट विकास अधिकारी गज्जलवार, पंचायत विस्तार अधिकारी रामटेके, ग्राम विकास अधिकारी पिलारे, रोजगारसेवक मिरवा कोरामी, दिनेश तिम्मा आदी उपस्थित होते.
सीईओंनी केली बंधारा कामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 1:10 AM
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी एटापल्ली तालुक्याच्या अतिदुर्गम तोडसा भागात शनिवारी दौरा करून तेथील वनराई बंधारा कामाची पाहणी केली. तसेच आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्याच्या समस्याही जाणून घेतले.
ठळक मुद्देदुर्गम भागात दौरा : तोडसा परिसरातील समस्या जाणून घेतल्या