गोंडवाना विद्यापीठांतर्गत वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा व ऑनलाईन परीक्षेचे फार्म भरताना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा फार्म नोंदणी करता आली नाही. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा नोंदणी झाली अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे ऑनलाईन प्रश्नपत्रिका उपलब्ध होऊ शकली नाही. तसेच काही विद्यार्थ्यांना नेटवर्कच्या तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देणे शक्य झाले नाही. विद्यापीठातील ७०० ते ८०० विद्यार्थ्यांना पुनश्च पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रथम वर्षापासून प्रवेश घ्यावा लागणार त्यामुळे विद्यापीठाने सीजीएस या जुन्या अभ्यासक्रमाव्दारेच परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याची संधी देण्यात यावी तसेच विद्यापीठ अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, असे राविकाॅंचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, तालुका अध्यक्ष गिरीश कोरामी, माही ढाली, अक्षय मडावी, मयुरी साखरे, जयमाला दुर्वे, धनश्री वानखेडे, रवी रामटेके यांनी म्हटले आहे.
सीजीएस जुन्या अभ्यासक्रमाव्दारेच विद्यापीठ घेणार परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:08 AM