शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
2
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
4
Maharashtra Assembly Election Result 2024:  शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही"; शिंदेंनी मानले लाडक्या बहिणींचे आभार
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 
7
Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
10
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल: महायुतीची लाडकी बहीण आदिती तटकरे जिंकल्या; औपचारिक घोषणा बाकी!
11
शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- "कमतरतेला ती..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: करेक्ट कार्यक्रम! महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली?
13
Wadala Vidhan Sabha Election Result 2024 : कालिदास कोळंबकरांचा वर्ल्ड रेकॉर्ड! वडाळ्यातून नवव्यांदा झाले आमदार
14
Maharashtra Assembly Election 2024 Result Worli Vidhansabha: वरळीत मोठा धक्का! आदित्य ठाकरे पाचव्या फेरीअखेर पिछाडीवर, आघाडीवर कोण?
15
Nanded Lok Sabha By Election Results 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य?
16
Ahilyanagar Assembly Election 2024 Result : अहिल्यानगरमध्ये दिग्गजांना धक्के! थोरात, रोहित पवार, लंके पिछाडीवर; महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: "महायुतीच्या विजयात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा, ऊर बडवण्याशिवाय..."; नेत्यांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...”
19
Maharashtra Assembly Election 2024 Result : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, "ते सोबत येणं हा..."
20
"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका

धान खरेदीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 5:00 AM

आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत धान खरेदी केंद्र चालविले जातात. मागील वर्षी महामंडळामार्फत एकरी १६ क्विंटल धान खरेदी केले. मात्र यावर्षी  केवळ ९ क्विंटल ६०  किलाे धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिराेंचा तालुक्यात एकरी २०  ते  २५  क्विंटल धानाचे उत्पादन झाले आहे. महामंडळ केवळ ९.६० क्विंटल एवढेच धान खरेदी करणार आहे. उर्वरित विकायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला. धान खरेदीची मर्यादा एकरी २०  क्विंटल करावी, या मागणीसाठी चक्काजमा आंदाेलन करण्यात आले.

ठळक मुद्देखरेदीची मर्यादा वाढवा : नारायणपूर मार्ग अडविला; दीड तास आंदाेलन

लोकमत न्यूज नेटवर्कसिराेंचा : आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदीची मर्यादा एकरी २० क्विंटल करावी, या मागणीसाठी २१ डिसेंबर राेजी सकाळी ११ वाजतापासून नारायणपूर मार्गावर चक्काजाम आंदाेलन करण्यात आले. या आंदाेलनात महिला शेतकऱ्यांनीही सहभाग घेतला हाेता. आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत धान खरेदी केंद्र चालविले जातात. मागील वर्षी महामंडळामार्फत एकरी १६ क्विंटल धान खरेदी केले. मात्र यावर्षी  केवळ ९ क्विंटल ६०  किलाे धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिराेंचा तालुक्यात एकरी २०  ते  २५  क्विंटल धानाचे उत्पादन झाले आहे. महामंडळ केवळ ९.६० क्विंटल एवढेच धान खरेदी करणार आहे. उर्वरित विकायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला. धान खरेदीची मर्यादा एकरी २०  क्विंटल करावी, या मागणीसाठी चक्काजमा आंदाेलन करण्यात आले. तहसीलदारांचे प्रतिनिधी मंडळ अधिकारी एम.आर.बांडे व तलाठी रवींद्र शेरकी यांनी आंदाेलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. आंदाेलनातील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार एच.व्ही.सय्यद यांच्याशी माेबाईलवर  संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांनी दिले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, रवी सल्लमवार, आविसं तालुकाध्यक्ष बानय्या  जनगाम, राकाॅं तालुकाध्यक्ष मधुकर काेल्लुरी, सतीश भाेगे यांनी आंदाेलनस्थळाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला. जवळपास दीड तास आंदाेलन चालल्याने मार्गाच्या दाेन्ही बाजूला वाहनांची माेठी रांग लागली हाेती.  आंदाेलनाचे नेतृत्व व्यंकय्या भीमकरी, अशाेक इंगिली, पांते  मलय्या, रापेली आनंदराव, गट्टू चमकरी, मधुकर इंगिली, ताेंबरअला दुर्गय्या, दात्र स्वामी, राजेंद्र नसकुरी, नागराजू इंगिला, येलख्खा  लिंगय्या, स्वामी नुसेटी, ताला व्यंकल्ला, राजू  कुडेकरी यांनी केले. आंदाेलनात नारायणपूर, मेडाराम, कारसपल्ली, अमरादी, रंगय्यापल्ली, कुरखेडा, टेकडा या गावांमधील तसेच परिसरातील शेकडाे शेतकरी सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :Chakka jamचक्काजामFarmerशेतकरी