लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : शासकीय आदेशाने बंदी असतानाही खर्रा व तंबाखूयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्या तीन दुकानांतून मोठा साठा नगर पंचायतीने जप्त केला. त्याचबरोबर घरातच भेसळयुक्त तंबाखूचा व्यवसाय थाटणाºया एका इसमाच्या घरी धाड टाकून मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.सदर कारवाई १ मे रोजी शुक्रवारला चामोर्शी पोलीस, नगर पंचायत, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथक आणि मुक्तिपथने संयुक्तपणे केली. शासन व प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून डेली निड्सच्या वस्तूच्या नावाखाली चामोर्शी शहरात लपून-छपून खर्राविक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुक्तिपथ व प्रशासनाने शुक्रवारी चामोर्शी शहरातील एस. के. पान मटेरियल, पूजा पान मटेरियल व बालाजी किराणा दुकानात धाड मारली असता तंबाखूजन्य पदार्थां साठा आढळला. हा सर्व माल नगर पंचायतीने जप्त केला.सुगंधित तंबाखूविषयी माहिती विचारली असता गोंड मोहल्ल्यातील एक इसम खर्रा विक्रेत्यांना तंबाखू पुरवत असल्याची माहिती दुकानदारांनी दिली. संबंधित इसमाचे घर गाठून तपासणी केली असता घराच्या वरच्या मजल्यावर सुगंधित तंबाखू, साधा तंबाखू, प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा आणि इतरही मुद्देमाल मोठ्या प्रमाणात सापडला. साधा व सुगंधित तंबाखू एकत्र करून भेसळयुक्त तंबाखू बनवून प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये चामोर्शी शहरात पानठेलाधारक व किराणा दुकानदारांना तो विक्री करीत असल्याचे उघड झाले.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा समन्वयक डॉ. नंदू मेश्राम, मुक्तिपथ संचालक डॉ. मयूर गुप्ता, चामोर्शी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सतीश चौधरी, निखिल कारेकर, विजय पेद्दिवार, पोलीस कर्मचारी रजनीकांत पिल्लेवान, मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे, उपसंघटक विनायक कुनघाडकर यांनी ही कारवाई केली. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेत आरोपीविरोधात चामोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात खर्रा बनवून त्याची छुप्या मार्गाने विक्री करण्याचे प्रकार सध्या सुरू आहे. संपूर्ण टिमने एका तंबाखू विक्रेत्याच्या घरी धाड मारली असता खर्रा बनविण्याची मशीन सापडली. ही मशीनही ताब्यात घेण्यात आली. प्रशासनाच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून दररोज तंबाखूविरोधी धाडसत्र सुरू आहे.आरमोरीत तीन दुकानातून साहित्य जप्तआरमोरी : आरमोरी शहरातील गिरिमल, जे.के. आणि अली किराणा स्टोअर्स या दुकानांमध्ये सुपारी, तंबाखू व इतरही साहित्य सापडले. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेत नगर परिषदमध्ये जमा करून दंडात्मक कारवाई करण्यात आली.वैरागडात किराणा दुकानातून खर्राविक्रीवैरागड : आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाºया तीन दुकानांवर स्थानिक ग्रामपंचायत, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि मुक्तिपथने संयुक्त कारवाई करून मुद्देमाल ताब्यात घेतला. या तीनही विक्रेत्यांवर ग्रामपंचायतने प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला. लॉकडाऊन काळात अशा विक्रेत्यांवर दंड करण्याचा ही पहिलीच घटना ठरली. सर्वत्र पानठेले बंद असले तरी किराणा दुकानांतून या पदार्थांची विक्री होत आहे. तालुक्यातील वैरागड येथील येथील तीन किराणा दुकानदार खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व साठवणूक करीत असल्याची माहिती मुक्तिपथ गाव संघटनेद्वारे तालुका चमुला मिळाली. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा समन्वयक डॉ. नंदू मेश्राम, मुक्तिपथ संचालक डॉ. मयूर गुप्ता, तालुका संघटक नीलम हरिणखेडे, सरपंच गौरी सोमनानी, उपसरपंच अहिरकर, सदस्य भोलू सोमनानी आणि पोलीस पाटील अहिरकर या सर्वांनी मिळून सिद्धिकी किराणा स्टोअर्स, गुरुनुले किराणा स्टोअर्स आणि जय किराणा स्टोअर्स या तीनही दुकानांची तपासणी केली असता खºर्यासाठी वापरण्यात येणारी सुपारी, तंबाखू, नस, बिडी, सिगरेट, खर्रा पन्नी आदी साहित्याचा मोठा साठा सापडला. ३० हजाराच्या आसपास असलेला सर्व साठा जप्त करून ग्रामपंचायतमध्ये जमा करण्यात आला. तीनही विक्रेत्यांवर प्रत्येकी पाच हजाराचा दंड ग्रामपंचायत ने ठोठावला.
चामोर्शीत प्रशासनाने केला तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 5:00 AM
इसमाचे घर गाठून तपासणी केली असता घराच्या वरच्या मजल्यावर सुगंधित तंबाखू, साधा तंबाखू, प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा आणि इतरही मुद्देमाल मोठ्या प्रमाणात सापडला. साधा व सुगंधित तंबाखू एकत्र करून भेसळयुक्त तंबाखू बनवून प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये चामोर्शी शहरात पानठेलाधारक व किराणा दुकानदारांना तो विक्री करीत असल्याचे उघड झाले.
ठळक मुद्देगोदामावर धाड । खर्रा घोटण्याची मशीन जप्त