शहरातील लांझेडा वाॅर्डात अवैध दारूविक्री होत असल्यामुळे वाॅर्डवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. वाॅर्ड संघटनेच्या महिलांनी वारंवार सूचना करूनही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. रविवारी वाॅर्डातील दोन घरी अवैध दारूविक्री सुरू असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने प्रकाश विजय पिपरे या दारूविक्रेत्याच्या घराची तपासणी केली असता २ हजार २०० रुपये किमतीची ११ लीटर मोहफुलाची दारू आढळून आली. तसेच लालाजी एकनाथ सूरजागडे याच्याकडील ३ हजार रुपये किमतीची १५ लीटर मोहफुलाची दारू ताब्यात घेण्यात आली. अशी एकूण ५ हजार २०० रुपयांची २६ लीटर मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय भास्कर ठाकरे, हवालदार प्रमोद वाळके यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.
===Photopath===
090521\09gad_4_09052021_30.jpg
===Caption===
लांझेडातून जप्त केलेली दारू.