शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

चव्हेला पुनर्वसनाचा पश्न कायम

By admin | Published: May 27, 2014 11:40 PM

आरमोरी तालुक्यातील कोसरी या सिंचन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र या प्रकल्पामुळे बुडीत होणार्‍या चव्हेला गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे. या गावाचा पुनर्वसन

डी. के. मेo्राम - मानापूर/देलनवाडी

आरमोरी तालुक्यातील कोसरी या सिंचन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र या प्रकल्पामुळे बुडीत होणार्‍या चव्हेला गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे. या गावाचा पुनर्वसन केल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र या गावाचे पुनर्वसन न करताच प्रकल्पाचे काम पुढे रेटून नेल्या जात आहे.

१0 वर्षांपूर्वी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तत्कालीन जलसंपदामंत्री डॉ. सुनिल देशमुख व आरमोरीचे आमदार आनंदराव गेडाम यांनी १९८0 च्या वनकायद्यामुळे रखडलेला कोसरी हा सिंचन प्रकल्प मार्गी लावला होता. ३३ वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात एकही सिंचन प्रकल्प मंजूर झालेला नव्हता. अशा परिस्थितीत आरमोरी तालुक्यातील कोसरी व कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा हे सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले होते.

कोसरी लघू पाटंबधारे योजनेमुळे बाधीत होणार्‍या वनक्षेत्राच्या मोबदल्यात वनविभागात ८0२ लाख रूपयाचे नक्त मालमत्ता मुल्य (एनपीव्ही रक्कम) भरण्यात आली होती. या योजनेमुळे ७७५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. कोसरी प्रकल्पाप्रमाणेच येंगलखेडा लघु पाटबंधारे योजनेखाली ९७२ लाख रूपयाचे नक्त मालमत्ता मुल्य भरण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ७१५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दोनही प्रकल्प आदिवासी बहूल व नक्षलग्रस्त भागात होत आहे. कोसरी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये चव्हेला हे गाव येते. त्यामुळे या गावाचे पुनर्वसन झाल्याशिवाय प्रकल्पाचे काम करू नये, अशी चव्हेलावासीयांची मागणी आहे. परंतु मागील वर्षीपासून या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली आहे. २0१२ मध्ये बांध (धरण) पूर्ण होणार आहे. या जागेवरील संपूर्ण झाडे तोडून वनविभागाच्या हवाली करण्यात आले आणि २0१३ मध्ये धरणाच्या पाळीचे काम जेसीबीच्या सहाय्याने सुरू करण्यात आले. धरण पाळीचे ५0 टक्के काम पूर्ण झाले. परंतु बाधीत शेतीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही व पुनर्वसनाचा प्रश्नही कायमच आहे. येथील नागरिकांशी समजोता करून काम सुरू करण्यात आले आहे. मात्र नागरिकांनी पुणे, मुंबई शहरात उद्योगासाठी जमिनी घेताना जो मोबदला दिला जातो. त्या धर्तीवर येथेही मोबदला दिला जावा, अशी मागणी लावून धरली आहे. प्रती एकर ८ ते १0 लाख रूपये रक्कम मिळावी, अशी मागणी येथील शेतकर्‍यांची आहे. या संदर्भात काही शेतकर्‍यांनी न्यायालयात खटलाही गुदरला आहे. तर काही शेतकर्‍यांनी या प्रकल्पाचे पाणी ज्या ठिकाणी पोहोचते त्या ठिकाणी आम्हाला जमीन देऊन आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहे. अद्याप पुनर्वसन न करताच कोसरी सिंचन प्रकल्पाचे काम रेटून नेल्या जात आहे.