शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वन कायद्यात रखडला चेन्ना प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:52 AM

मुलचेरा तालुक्यात मुकडी गावाजवळ चेन्ना नदीवर बांधण्यात येणारा चेन्ना हा मध्यम सिंचन प्रकल्प १९८४ पासून बंद पडला आहे. मुलचेरा तालुक्यातील सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींची कमालीची उदासीनता आजवर दिसून आली आहे.

ठळक मुद्देसिंचनाअभावी शेकडो शेतकरी अडचणीत : केंद्र व राज्य सरकार सुस्त, ३३ वर्षांपासून प्रकल्प थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुलचेरा तालुक्यात मुकडी गावाजवळ चेन्ना नदीवर बांधण्यात येणारा चेन्ना हा मध्यम सिंचन प्रकल्प १९८४ पासून बंद पडला आहे. मुलचेरा तालुक्यातील सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींची कमालीची उदासीनता आजवर दिसून आली आहे.दोन हजार ३४२ हेक्टर सिंचनक्षमता असलेल्या या प्रकल्पावर आॅक्टोबर २०१४ पर्यंत म्हणजे प्रकल्प बंद झाला त्यावेळी पर्यंत १४२.६४ लक्ष रूपये खर्च करण्यात आला. २००६ मध्ये वन कायदा पारीत झाला. त्यानंतर देशबंधूग्राम, भगवतनगर, विवेकानंदपूर, श्रीनगर या चार ग्रामसभांनी ठराव करून जिल्हाधिकाºयांना सादर केला. २९ जून २०१० ला जिल्हाधिकाºयांनी अभिप्रायासह सुधारित दराप्रमाणे लाभव्यय गुणोत्तर काढण्यासाठी ५ मार्च २०११ ला प्रस्ताव परत करण्यात आला. २२ मार्च २०११ ला उपवनसंरक्षक यांच्याकडून माहिती मागविण्यात आली. १५ एप्रिल २०११ ला उपवनसंरक्षक आलापल्ली यांनी वनक्षेत्राचे सीमांकन प्रस्तावित केले आहे. १३ जून २०११ ला सीमांकन पूर्वी करण्यात आल्याचे कळविले. २१ आॅगस्ट २०१३ ला मुख्य वनरसंरक्षक प्रादेशिक यांच्या कक्षात अधीक्षक अभियंता पाटबंधारे प्रकल्प चंद्रपूर यांची बैठक झाली. मुख्य वनसंरक्षकांनी सीमांकन करून दिलेले असल्यामुळे सीमांकनाची आवश्यकता नाही, असे निर्देश दिले. वनप्रस्तावासह केंद्र शासनाची अंतिम मान्यता प्राप्त झाल्यानंतर भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यावेळी देण्यात आली होती. मात्र कार्यवाही शुन्य आहे.वन जमिनीचा अडथळा१९८० मध्ये वन कायदा अस्तित्वात आल्यामुळे प्रकल्पाची संपूर्ण कामे १९८४ पासून स्थगीत करण्यात आली. प्रकल्पाच्या कामास लागणारी वन जमीन हस्तांतरित न झाल्यामुळे प्रकल्पाच्या कामास पुन्हा सुरुवात करण्यात आलेली नाही. प्रदीर्घ कालावधीपासून हा सिंचन प्रकल्प प्रलंबित आहे.

टॅग्स :Damधरण