शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

जिल्हास्तरीय महोत्सवात बालकांच्या कलांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:06 PM

लोकमत बाल विकास मंच गडचिरोलीच्या वतीने १० मार्च रोजी स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्हास्तरीय बाल महोत्सव २०१९ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान एकल नृत्य, समुह नृत्य व वेशभुषा आदी स्पर्धांमधून सहभागी २०० बाल स्पर्धकांनी आपल्या कला गुणांची उधळण केली.

ठळक मुद्देविजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव : स्पर्धेत २०० बाल स्पर्धकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकमत बाल विकास मंच गडचिरोलीच्या वतीने १० मार्च रोजी स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्हास्तरीय बाल महोत्सव २०१९ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान एकल नृत्य, समुह नृत्य व वेशभुषा आदी स्पर्धांमधून सहभागी २०० बाल स्पर्धकांनी आपल्या कला गुणांची उधळण केली. बालकांचाही या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळाला. सदर महोत्सवातील स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील २० शाळांनी सहभाग घेतला.लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे तर अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.शरदचंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चातगाव येथील साळवे नर्सिंग कॉलेजचे संस्थापक डॉ. प्रमोद साळवे, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, पुष्पा देवकुले, लोकमत सखीमंचच्या जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे, सहसंयोजिका सोनिया बैस आदी उपस्थित होते.याप्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी पाटील म्हणाले, लोकमत बाल विकास मंचच्या या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतर क्षेत्रात प्रगती करण्याची संधी उपलब्ध होत आहे. एसडीपीओ विशाल ढुमे यांनी शरीर सुदृढ राहण्यासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहणे काळाची गरज आहे. शरीर जर निरोगी व सुदृढ असले तर विद्यार्थी व नागरिकांना कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यास अडचण जात नाही, असे सांगितले. याप्रसंगी डॉ. गणेश जैन यांनी लोकमतच्या इव्हेंट विभागाच्या माध्यमातून वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रम व उपक्रमांची माहिती दिली.याप्रसंगी स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षिका अर्चना मुळे, रोशन आंबोरकर आणि परीक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक बाल विकास मंच जिल्हा संयोजिका किरण राजेश पवार, संचालन नरेंद्र उंदीरवाडे यांनी तर आभार भारती रोहणकर यांनी मानले. या महोत्सवाला शाळकरी विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण प्रतिभा रामटेके, प्रतिक भैसारे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी ट्रिट आईसक्रिम पार्लरतर्फे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आईस्क्रिम वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रशासनाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदना दरेकर, रोहिणी मेश्राम, तृप्ती अलोणे, सुदर्शन जानकीवार, अंकिता सावसाकडे, प्रणाली न्यालेवार यांनी सहकार्य केले.या मुख्याध्यापकांचा सत्कारलोकमत बाल विकास मंचच्या चळवळीत नेहमी सहकार्य करणाऱ्या गडचिरोली शहरातील शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापकांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये शिवाजी हायस्कूल तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य घनश्याम दिवटे, गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी, वियानी विद्यानिकेतनचे प्राचार्य फादर टॉमी, स्कूल आॅफ स्कॉलर्सचे प्राचार्य निखील तुकदेव, कारमेल हायस्कूलचे प्राचार्य फॉदर जिनेश मॅथ्यू, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंटच्या प्राचार्य सविता सादमवार, प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलचे प्राचार्य रहिम अमलानी, विद्याभारती हायस्कूलचे प्राचार्य बी. जी. कुंभरे, टिष्ट्वंकल स्टार कॉन्व्हेंटच्या प्राचार्य सुनिता पराते, राजर्षी स्कॉलर्स अकाडमीच्या प्राचार्य रंजना चांदेकर आदींचा समावेश आहे. तसेच यावेळी गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे नरेंद्र उंदीरवाडे यांचाही बाल विकास मंचच्या नोंदणीत सहकार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.स्पर्धेतील विजेते स्पर्धक विद्यार्थीलोकमत बाल विकास मंचतर्फे घेण्यात आलेल्या एकल नृत्य स्पर्धेत ५ ते १० या वयोगटातून संघवी कापकर हिने प्रथम, अयान म्हशाखेत्री द्वितीय तर मधुरा सावंत व पूर्वा सहारे यांनी तृतिय क्रमांक पटकाविला. या वयोगटातून अश्लेषा पतरंगे, सिध्दी बोमनवार, गौरी सोरते, नव्व्या देशमुख, अनुष्का साळवे आदींना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. ११ ते १५ वर्ष वयोगटातून एकल नृत्य स्पर्धेत प्रेरणा लेनगुरे प्रथम, मुस्कान बारसिंगे द्वितीय तर मोहिनी बारसिंगे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. सदर वयोगटातून शंतनू ठेंगरे व जान्हवी त्रिवेदी हे प्रोत्साहनपर बक्षिसाचे मानकरी ठरले.समुह नृत्य स्पर्धेतून ५ ते १० वयोगटातून पॅराडाईज इंग्लिश मिडीअम स्कूल धानोरा यांनी प्रथम, ललाटी भंडार ग्रुपने द्वितीय तर मल्हार ग्रुप (मयुरी डान्स क्लास) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. सदर गटातून संचिती रामटेके ग्रुप व शिवम अ‍ॅन्ड ग्रुप प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. ११ ते १५ वर्ष वयोगटात समुह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक लोकमान्य टिळक ग्रुप विद्या निकेतन लोकमान्य टिळक देसाईगंज यांनी पटकाविला. शिवाजी गाईड ग्रुपने द्वितीय तर रिध्दीसिध्दी ग्रुपने तृतीय क्रमांक पटकाविला. स्टार ग्रुप विद्याभारती हायस्कूल, एसडी ग्रुप कारमेल हायस्कूल व बर्फी ग्रुप विद्याभारती हायस्कूल आदी समुह प्रोत्साहनपर बक्षिसाचे मानकरी ठरले.५ ते १० वर्ष वयोगटात घेण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम क्रमांक मनस्वी मुलकलवार, द्वितीय क्रमांक अश्विरा रामकिरीत यादव तर तृतीय क्रमांक सोहम चिलमवार यांनी पटकाविला. ११ ते १५ वयोगटातून सदर स्पर्धेत रोशन ढोंगे यांनी प्रथम क्रमांक, प्रेरणा लेनगुरे द्वितीय तर शिवाणी गुप्ता हिने तृतीय क्रमांक पटकाविला.