शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

रस्त्याअभावी पोटातच दगावले बाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 1:04 AM

तालुक्यातील पुस्के येथे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे गावातील गरोदर मातेला प्रसुतीसाठी रूग्णालयात भरती करण्यास उशीर झाल्याने बाळ दगावल्याची घटना घडली. पुस्के हे गाव एटापल्ली-गट्टा मार्गावर एटापल्लीपासून ३५ किमी अंतरावर आहे.

ठळक मुद्देतीन किमी पायवाटेने जावे लागते गावात : पुस्के येथील गरोदर मातेने केला थक्क करणारा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील पुस्के येथे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे गावातील गरोदर मातेला प्रसुतीसाठी रूग्णालयात भरती करण्यास उशीर झाल्याने बाळ दगावल्याची घटना घडली.पुस्के हे गाव एटापल्ली-गट्टा मार्गावर एटापल्लीपासून ३५ किमी अंतरावर आहे. एटापल्ली-गट्टा मार्गावर अडंगेगावापर्यंत मार्ग आहे. अडंगेगाव ते पुस्के गावामधील अंतर तीन किमी आहे. यादरम्यान रस्ता नसल्याने नागरिकांना जंगलातून पायवाटेचा आधार घेत अनेक लहान-लहान नाले पार करावे लागतात.२० आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास पुस्के येथील गरोदर माता चिमरी देवू लेकामी हिला पोटात वेदना होऊ लागल्या. गावातील दायी पाडे लेकामी हिने तब्येत तपासून तत्काळ रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. आशावर्कर सुनिता हिने तीन किमी अंतर पायी चालून सात किमी अंतरावरील जांभिया येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पोहोचली. याबाबतची माहिती सिस्टर दिला. तेथील सिस्टर सुरेखा महालदार यांनी स्वत:च्या कारने अडंगेपर्यंत पोहोचल्या. तेथून तीन किमी पायी चालत जाऊन गर्भवती मातेची तपासणी केली. गावातील रामकेवल बेक, गोटा, विनोद टोपा, विनोद दुर्वा या चार युवकांनी कंबरभर पाण्यातून गरोदर महिलेला तीन किमीपर्यंत खाटेवर बसवून आणले. कारने १० किमी अंतरावरील गट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तेथून खासगी वाहनाने ३६ किमी अंतरावरील ग्रामीण रूग्णालय एटापल्ली येथे आणण्यात आले. एटापल्लीवरून पुन्हा अहेरी येथे हलविण्यात आले. अहेरी रूग्णालयात गरोदर मातेने मृत बाळाला जन्म दिला. गरोदर माता वेळेवर रूग्णालयात पोहोचली असती तर बाळ जीवंत असते. आरोग्य कर्मचारी व गावातील नागरिकांनी केलेली धडपड व्यर्थ गेली. त्यामुळे मृत बाळ जन्माला आल्याचे कळताच सर्वांनाच रडू कोसळले. चार दिवस अहेरी येथे चिमरी लेकामीवर उपचार केल्यानंतर २४ आॅगस्ट रोजी तिला सुटी देण्यात आली. अहेरीवरून तिला अडंगेपर्यंत वाहनाने सोडण्यात आले. मात्र पुन्हा तिन किमीपर्यंत चालतच जावे लागले. तालुक्यातील लोहखनिजाचे खनन करून खासगी कंपन्या मालामाल होत चालल्या आहेत. मात्र येथील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.धानाच्या बांध्यांमधून मार्गपुस्के गावाला जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता नाही. काही दूर अंतरापर्यंत धानाच्या बांध्यांमधून पायवाटेने जावे लागते. पुस्के गावातील शिक्षक दीपक नागपुरवार यांनी गावकऱ्यांच्या सहकार्यातून बांबूचा रस्ता तयार केला आहे. या बांबूवरूनही दुचाकी चालवितांना कसरत करावी लागते.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक