गडचिराेली : काेराेनाच्या संकटामुळे ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पर्याय समाेर आला. दरम्यान पहिल्या वर्गापासून दहावी व बारावीपर्यंतचे विद्यार्थी स्मार्ट फाेन, आयपॅड व संगणकाचा वापर करू लागले. दरम्यान ऑनलाईन शिक्षण घेतानाच कंटाळा येण्याच्या नावावर विविध प्रकारचे कार्टून व गेम पाहण्याचे प्रमाण वाढले. गेल्या आठ-दहा महिन्यात पाहता पाहता शाळकरी मुले माेबाइलच्या अति वापराच्या विळख्यात सापडले आहेत. यामुळे त्यांच्या मानसिक आराेग्यावर परिणाम हाेत आहे.
ऑनलाईन अभ्यासक्रम व शिक्षणात माेबाइलचा अतिवापर झाल्याने शाळकरी मुलांच्या डाेळ्यावर परिणाम झाला. ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून मुलगा, मुलगी शिकत असल्याचा आनंद त्यावेळी पालकांना झाला. मात्र हा आनंद भविष्यात धाेकादायक ठरू शकताे. अगदी लहान मुलेे नंबरचे चष्मे लावून फिरत असल्याचे गडचिराेली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात दिसून येते.
विविध प्रकारच्या कार्टूनसह शाळकरी मुले व बालके अनेक प्रकारचे गेम खेळत आहेत. फ्रिफायर, कॅरम व इतर गेममध्ये मुले, मुली व्यस्त असल्याचे दिसून येते. यात बराच वेळही घालविला जात आहे.
बाॅक्स...
विटीदांडूसह जुने खेळ झाले गायब
१० ते २० वर्षांपूर्वी शाळकरी मुले, मुली सुटीच्या दिवशी तसेच फावल्या वेळात विटीदांडू, लंगडी, लगाेरी, कंच्या आदीसह अनेक प्रकारचे खेळ खेळत हाेते. मात्र काळानुरूप हे जुने खेळ आता पूर्णत: हद्दपार झाले आहेत. आता काेराेना संसर्गाच्या भीतीने तसेच उन्हाळ्यातील वाढत्या उन्हामुळे मुले, मुली घरीच राहत आहेत. घरी राहून टीव्ही पाहणे, माेबाइलवर विविध प्रकारचे गेम खेळणे, घरी बसून कॅरम, सापसिडी खेळणे आदी प्रकार सुरू आहेत. माेबाइलवरील गेमकडे बालके आकृष्ट झाले आहेत.
बाॅक्स....
मुले बराच वेळ माेबाइलवर
काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळांतर्फे स्मार्ट फाेनवर गृहपाठ दिला जात आहे. व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विविध विषयाच्या अध्यापनाचे व्हिडिओ सुद्धा पाठविले जात आहेत. शाळकरी मुले माेबाइलच्या आग्रहापाेटी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र कंटाळा येत असल्याचे सांगून अर्धा ते एक तास तर काही विद्यार्थी दाेन तास माेबाइलवर गेम खेळत आहेत. विविध प्रकारच्या ॲपमध्ये जाऊन छायाचित्र काढले जात आहे.
बाॅक्स....
काेराेनामुळे माेबाइल गेम खेळण्यासाठी
काेराेना संसर्गाची महामारी सुरू झाल्यापासून पालकांकडून शाळकरी मुला, मुलींना सूचना करण्यात आल्या. बाळ घराबाहेर जाऊ नकाेस, मास्क लाव, रूमाल बांध, काळजी घे, असे सांगण्यात आले. तासनतास घरच्या घरी बसून कंटाळा येऊ लागल्याने बालके माेबाइलकडे आकृष्ट झाली. काेराेनाच्या भीतीने मुला, मुलींना वेळ घालविण्यासाठी माेबाइलचा आधार मिळाला. दरम्यान माेबाइल गेम खेळण्याचे प्रमाणही वाढले आहे. काेराेना महामारी येण्यापूर्वी बालकांना माेबाइल माहीत हाेते. मात्र काेराेनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाच्या नावावर माेबाइलचा वापर वाढला.
काेट...
शिक्षकांच्या सांगण्यानुसार मुलीचा हाेमवर्क पूर्ण हाेण्यासाठी तसेेच ऑनलाईन शिक्षणात अडचणी येऊ नये, यासाठी मुलीच्या हातात स्मार्ट फाेन दिले. ऑनलाईन शिक्षण हाेऊ लागले. मात्र माेबाइलवर गेम व कार्टून पाहण्याचे प्रमाण वाढले. माेबाइलवर जास्त गेम पाहू नकाे, अशी समजूत काढावी लागत आहे. माेबाइलचा वापर कमी हाेण्यासाठी काही कालावधी लागेल. माेबाइल वापरण्याचे प्रमाण हळूहळू कमी हाेईल.
- भाऊराव सलामे, पालक
काेट...
काेराेना महामारीच्या काळात शाळा बंद राहिल्याने मुलांचे काही दिवस शैक्षणिक नुकसान झाले. मात्र ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून मुले शिक्षण प्रक्रियेशी जुळून राहिले. मात्र ऑनलाईन शिक्षण व प्रत्यक्ष शिक्षण प्रक्रिया यात बरीच तफावत आहे. आता पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी अभ्यासात लागले आहेत. लहान मुलांमधील माेबाइलचा वेळ हळूहळू कमी हाेईल, पालकांनी तसा प्रयत्न करावा.
- सुजाता मुंजमकर, पालक