लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव (म.) : किशोरवयीन मुला/मुलींनी आपल्या आरोग्याची व आहाराची योग्य काळजी घेतल्यास देश सशक्त व बलशाली होण्यास वेळ लागणार नाही. किशोरवयीन मुले देशाच्या पाठीचा कणा आहे, असे प्रतिपादन आमगाव (म.) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणवीर यांनी केले.प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव (म.) अंतर्गत कुरूड उपकेंद्राच्या वतीने रामपूर येथे राष्ट्रीय किशोरी स्वास्थ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरूड येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद जुआरे होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.पं. सदस्य नानाजी पेंदाम, मुख्याध्यापक कोटनाके, अंगणवाडी कार्यकर्त्या निरंजना जुआरे, वैशाली सातपुते, आरोग्यसेविका पुष्पा तुरे, घ्यार, रवींद्र कुनघाडकर, हिराजी कोठारे, साईनाथ धोडरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोटनाके, संचालन आरोग्य सेवक गुणवंत शेंडे यांनी केले तर आभार जयश्री कुंभारे यांनी मानले.
मुले ही देशाच्या पाठीचा कणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 11:39 PM
किशोरवयीन मुला/मुलींनी आपल्या आरोग्याची व आहाराची योग्य काळजी घेतल्यास देश सशक्त व बलशाली होण्यास वेळ लागणार नाही.
ठळक मुद्देवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रतिपादन : रामपुरात किशोरी स्वास्थ कार्यक्रम