लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत ३९ ग्रामपंचायती आहेत. शासनाच्या वतीने सर्वसामान्य गरीब व गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी घरकूल योजना राबविली जाते. मात्र प्रशासकीय उदासीनता व ग्रा.पं.च्या दिरंगाईमुळे तालुक्यातील २० गावांतील बरेच कुटुंब घरकूल योजनेपासून वंचित असल्याचे दिसून येते.कमलापूर, व्यंकटापूर, दामरंचा, देचलीपेठा, मरपल्ली आदी भागातील अनेक गावांमध्ये शासनाची घरकूल योजना प्रभावीपणे पोहोचली नाही. परिणामी या भागातील आदिवासी नागरिक कच्च्या घरात वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. व्यंकटापूर भागात शिंदीचे छत असलेले घर आहे. अनेक आदिवासी कुटुंब कुडाच्या घरात वास्तव्य करतात. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांचे जीवनमान सुधारले नाही. अहेरी तालुक्यातील कमलापूर हे नक्षल्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातील बऱ्याच गावांचा विकास अजून झाला नाही. दामरंचा, भंगारामपेठा, चिंतरेब, चिरवेली, मांडरा, पलाकास, मोदुमोडगू, आसा, नैनगुडम, मदागू, वेलगूर आदी भागात अद्यापही मूलभूत समस्या कायम आहेत. या गावातील कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.अहेरी उपविभागाच्या विकासासाठी ठोस व प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.घराचे छत दुरूस्तीची लगबग वाढलीअहेरी तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये कच्चे घर असल्याने पावसाळा सुरू होताच घराची दुरूस्ती हाती घेतली जाते. अनेक नागरिक जंगलातून शिंद व गवत आणून त्याचे घरावर छत तयार करीत आहेत. या भागात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत असल्याने घराच्या दुरूस्तीच्या कामाला वेग आला आहे. वादळामुळे कित्येक घराच्या छतावरील कवेलू उडाले, विस्कळीत झाले. आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कवेलूची रचनाही योग्यरीत्या केली जात आहे.प्रशासनाचे नियोजन फेलस्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत या तीन संस्थांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने योजनांच्या अंमलबजावणीचे नियोजन केले जाते. घरकूल व इतर शासकीय योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ग्रा.पं. स्तरावर होते. मात्र अनेक कुटुंब घरकुलापासून वंचित असल्याने यंत्रणेचे नियोजन फेल आहे.
२० गावातील नागरिक घरकुलापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 5:00 AM
कमलापूर, व्यंकटापूर, दामरंचा, देचलीपेठा, मरपल्ली आदी भागातील अनेक गावांमध्ये शासनाची घरकूल योजना प्रभावीपणे पोहोचली नाही. परिणामी या भागातील आदिवासी नागरिक कच्च्या घरात वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. व्यंकटापूर भागात शिंदीचे छत असलेले घर आहे. अनेक आदिवासी कुटुंब कुडाच्या घरात वास्तव्य करतात. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांचे जीवनमान सुधारले नाही.
ठळक मुद्देकच्च्या घरात सुरू आहे आदिवासी कुटुंबीयांचे वास्तव्य; कोट्यवधीचा निधी येऊन विकास नाही