ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : जनहितवादी समिती तथा ग्रामसंघाचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनहक्क कायद्यांतर्गत नागरिकांना वनहक्क पट्ट्यांचे वितरण तत्काळ करावे, यासह इतर मागण्यांसाठी जनहितवादी युवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ जानेवारीपासून धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे.सूरजागड लोह प्रकल्पात पेसा कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. गौण वनोपज व वन संपदेचे प्रचंड नुकसान होत आहे. यावर प्रतिबंध घालावा आदी मागण्यांसाठी ५ जानेवारीपासून आंदोलन केले जात आहे. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व सुरेश बारसागडे, माधव गावडे, बंडू मट्टामी, मधुकर पुडो, बांडू गावडे, केशव पुडो, निर्मल गोटा करीत आहेत.