२०११च्या जनगणनेनुसार सिंगणपेठ गावात ६७ कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील लोकसंख्या २३३ आहे. यामध्ये पुरुष ११८ व स्त्रिया ११५ आहेत. टिकेपल्ली गावात ८८ कुटुंब असून, तेथील लोकसंख्या ३५३ आहे. यामध्ये १७१ पुरुष, तर १८२ स्त्रिया आहेत. नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी दोन्ही ठिकाणी जावे लागते. यात बराचसा वेळ व पैसा खर्च करावा लागतो. अतिवृष्टीची भरपाई, निवडणूक संदर्भ, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पीककर्ज माफी यासारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामसेवक व पटवारी या दोघांची गरज असते. परंतु दोन तालुक्याच्या फेऱ्या मारण्यातच गावातील नागरिकांचा वेळ जाताे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावर योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
दाखल्यांसाठी नागरिकांचे दाेन तालुक्यात हेलपाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:36 AM