सिराेंचा : शासनाच्यावतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर यासाठी जनजागृती केली जात आहे. परंतु अंकिसा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला सर्वत्र प्लास्टिक, कचरा, काचेच्या बाटल्या व अन्य कचरा दिसून येतो. सिरोंचा तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळख असलेल्या अंकिसा येथून आसरअल्लीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. रस्ता रूंद असल्यामुळे गावातील अनेक नागरिक येथील कचरा गावाबाहेर रस्त्याच्या कडेला फेकतात. सध्या गावाच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे मोठमोठे ढीग दिसून येतात. काही व्यावसायिक तसेच नागरिक रस्त्याकडेला जाणूनबुजून कचरा फेकताना दिसून येतात. रस्त्याच्या बाजूला कचरा टाकू नये, यासाठी ग्रामपंचायतीने अनेकवेळा जागृती केली आहे. मात्र नागरिकांची सवय सुटत नसल्याचे दिसून येत आहे. वैयक्तिक शाैचालयाची माेहीम माेठ्या प्रमाणात राबविण्यात आली. मात्र अनुदान घेतल्यानंतर शाैचालयाचा वापर ग्रामीण भागात कमी झाला आहे.
कचऱ्याच्या ढिगांमुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:36 AM