लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीसह जिल्ह्यातील विविध ८ ते १० संघटनांनी एकत्र येऊन गुरूवारी जिल्हाभर शाळाबंद आंदोलन पुकारले. मुंबई येथे शिक्षकांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ शिक्षकांनी पुकारलेल्या या बंदनिमित्त दिवसभर जिल्हाभरातील शाळा बंद होत्या.२५ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबई येथे समान वेतन मिळविण्याच्या मागणीसाठी विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन केले. दरम्यान आंदोलन करणाऱ्या या शिक्षकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. यात २० ते २५ शिक्षक गंभीर जखमी झाले. पोलिसांच्या या कृत्याच्या निषेधार्थ शिक्षक व शाळांच्या संघटनांनी गुरूवारी दिवसभर शाळाबंद आंदोलन केले. गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा तालुक्यासह अहेरी उविभागातही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अहेरी उपविभागाच्या काही शाळांच्या शिक्षकांनी काळ्या फिती लावून लाठीमार हल्ल्याचा तसेच शासनाच्या धोरणाचा निषेध केला.देसाईगंज येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, राज्य शासकीय, निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने देसाईगंजच्या तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यिात आले. शिक्षकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. देसाईगंज तालुक्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळा आज दिवसभर बंद होत्या. तहसीलदारांना निवेदन देताना पेन्शन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष अतुल बुराडे, उपाध्यक्ष प्रमोद काशिवार, सचिव रामेश्वर गभने, जी. एम. तिजारे, हिराजी मडावी, केतन कुथे, प्रा. एस. एन. लंजे, प्रा. एल. जे. टिकले, प्रा. विजय कावळे, प्रा. आर. एन. नाकाडे, प्रा. बाळबुध्दे, प्रा. एच. एन. मारगाये, एन. डी. काशिवार, सयाजी कापगते, दिलीप शेंडे व बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.सदर शाळा बंद आंदोलनात विनाअनुदानित कृती समिती, मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्रराज्य शिक्षक परिषद, विदर्भ माध्यमिक शिक्षक परिषद, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षण परिषद, विदर्भ ज्युनिअर कॉलेज असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. या आंदोलनात विनाअनुदानित कृती समितीचे जिल्हाध्यक्ष विलास बल्लमवार, संस्थाचालक संघटनेचे राजेंद्र लांजेकर, जयंत येलमुले यांनी सक्रीय सहभाग नोंदविला होता.शिक्षकांनी लावल्या काळ्या फितीअहेरी तालुक्यातील सर्व शाळा दिवसभर बंद होत्या. अहेरी येथील राजे धर्मराव कृषी विद्यालय, संत मानवदयाल हायस्कूल, भगवंतराव हायस्कूल, च.ल. मद्दिवार प्राथमिक शाळा तसेच इंदाराम येथील अनुदानित शाळा बंद होत्या व येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळाबंद ठेवून तसेच काळ्या फिती लावून मुंबईतील लाठीमार घटनेचा निषेध केला. अहेरी भागासह जिल्हाभरात शाळाबंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला.
शाळाबंद आंदोलनाने ठप्प पडले वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:02 AM
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीसह जिल्ह्यातील विविध ८ ते १० संघटनांनी एकत्र येऊन ...
ठळक मुद्देजिल्हाभरात १०० टक्के प्रतिसाद : शिक्षकांनी केला लाठीमार घटनेचा निषेध