स्वच्छतेची दिली शपथ : नगर परिषद, रेल्वे विभाग यांचा संयुक्त उपक्रमदेसाईगंज : रेल्वे सल्लागार समिती, नगर परिषद देसाईगंज, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत देसाईगंज रेल्वे स्थानकावर २६ मे रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान रेल्वे स्थानकाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे १६ ते ३१ मे दरम्यान स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. यात कार्यालय, सेवा कार्यालय, रेल्वे कामकाज ठिकाणी साफसफाई करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार देसाईगंज रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्यात आला. यावेळी वरिष्ठ मंडळ अभियंता व्ही.व्ही. सत्यनारायण, मुख्य यातायात निरीक्षक एस. डी. बागडे, नगराध्यक्ष श्याम उईके, रेल्वे सल्लागार समिती सदस्य डॉ. विष्णू वैरागडे, ऋषी शेबे, अधीक्षक पी. एस. भोंडे, सहायक रितेशकुमार, रेल्वे पथक अभियंता गुप्ता, आयओडब्ल्यू सिंग, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तैमूर मुलानी, आरोग्य निरीक्षक उदेलाल सोनेकर, अजय ढोक, रवी शेंद्रे, शेख इस्माईल, आकाश सत्या, गंगाधर पटले, मोहन मगरे, दीपक मगरे, बिंदूसर लोखंडे, लालनकुमार आदी उपस्थित होते. या सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
रेल्वे स्थानकाची केली स्वच्छता
By admin | Published: May 28, 2016 1:30 AM