लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वैरागड परिसरातील गावांमध्ये पांदण रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. मात्र या कामांकडे ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्याने या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.दुरूस्तीच्या कामाचे मूल्य २० हजार रूपयांपेक्षा अधिक असल्यास कामाच्या ठिकाणी संबंधित कामाबाबतचे लोखंडी फलक लावणे आवश्यक आहे. मात्र अनेक पांदन रस्त्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे फलक लावले नाही. पांदण रस्ता बनविल्यानंतर या रस्त्याची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची असताना वैरागड, सुकाळा, मोहझरी, देलनवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक पांदण रस्त्यांचे खडीकरण झाले नसल्याने पावसाळ्यात या रस्त्यांवर चिखल निर्माण होते. परिणामी शेतकरी व नागरिकांना शेताकडे जाण्यास कठीण होत आहे.आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येणाºया देलनवाडी येथे २०१४-१५ या वर्षात लोभाजी अहिरकर ते वसंत घोडमारे यांच्या शेतापर्यंत पांदन रस्ता तयार करण्यात आला. परंतु आजच्या स्थितीत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वैरागड येथील दादाजी बावणकर ते चूनबोडी रस्त्याचे खडीकरण अजूनपर्यंत झाले नाही. मेंढेबोडी सुकाळा या रस्त्यादरम्यान दोन पांदन रस्ते तयार करण्यात आले. मात्र त्यांचा काहीच उपयोग नाही.वैरागड-आरमोरी मार्गावर पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाणाºया तलावाच्या काठावर दोन शेतकºयांसाठी लाखो रूपये खर्च करून पांदन रस्ता तयार करण्याचे काम प्रशासनाने केले आहे. वैरागड येथील मेघराज भानारकर ते मनोहर बावणकर यांच्या शेतजमिनीच्या हिरापूर येथील पांदन रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.आरमोरी पंचायत समिती अंतर्गत २०१४-१५ ते २०१७-१८ या वर्षात वैरागड, सुकाळा, ठाणेगाव, देलनवाडी येथील पांदन रस्त्याच्या कामाची चौकशी करावी. दोषी अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे सचिव राहूल धाईत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मुख्य रस्त्यालगतच पांदण रस्ताठाणेगावपासून थोड्याच अंतरावर दोन पांदण रस्ते तयार झाले. या ठिकाणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. गरज नसताना डांबरी रस्त्याला लागून अगदी २० फुटावर पांदण रस्ता तयार करण्यात आला.आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वैरागड, सुकाडा, देलनवाडी येथील पांदन रस्ता बांधकामावरील आर्थिक गैरव्यवहार, कामाचा दर्जा, अपूर्ण काम याबाबत आपल्याकडे अजूनपर्यंत तक्रार आली नाही. तक्रार आल्यास त्याची चौकशी केली जाईल.- पी. आर. रायपुरे,विस्तार अधिकारी (पंचायत),पंचायत समिती आरमोरी
पांदण रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:36 PM
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वैरागड परिसरातील गावांमध्ये पांदण रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. मात्र या कामांकडे ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्याने या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
ठळक मुद्देपावसाळ्यात होतो चिखल : अनेक ठिकाणी शेतीचे काम