ऑनलाईन लोकमतवैरागड : फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षांपासून दर उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होत असताना स्थानिक प्रशासनाने कोणती उपाययोजना केली, असा प्रश्न उपस्थित करीत गावातील टिल्लूपंप बंद करावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान गावातील पाणी समस्येबरोबरच इतरही प्रश्नांवर ग्रामसभा चांगलीच गाजली.वैरागड येथे उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्यां पाणी टंचाई समस्येच्या निवारणासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कार्यक्रमांतर्गत गोरजाई डोहावर पाणीपुरवठा योजना २०१३ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. परंतु या योजनेची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. या योजनेनुसार नवीन पाणीपुरवठा विहीर व फिल्टरेशन गॅलरी, नवीन गृहपंप, नवीन पाईपलाईन, गावात नवीन वितरण व्यवस्था आदींचा समावेश होता. परंतु नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी कुठे मुरले हे समजण्या पलिकडचे होते. नवीन पाणीपुरवठा योजनेची फाईल मंत्रालयात असल्याचे राष्टÑीय ग्रामीण पेयजल योजनेचे अधिकारी सांगतात. ही योजना रखडण्यास संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.सध्या चालू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचे गावात समान वितरण होत नाही. याला कारण नळधारक आहेत. अनेक कुटुंबात विद्युत टिल्लूपंप वापरले जात असल्याने इतर कुटुंबांना पिण्याचेही पाणी मिळत नाही. त्यामुळे ज्यावेळेत नळ योजनेचा पाणीपुरवठा सुरू असतो. त्यावेळी विद्युत पुरवठा बंद ठेवण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी सरपंच गौरी सोमनानी, उपसरपंच श्रीराम अहीरकर, ग्रा. पं. सदस्य नलिनी आत्राम, नलिनी सहारे, माधुरी बोडणे, संगीता धनकर, पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर, अतुल मेश्राम, मुनेश्वर मडावी, सुमन खरवडे, राजू आकरे, सुरेंद्र बावनकर, नामदेव धनकर उपस्थित होते.गाळ उपसाची चौकशी करणारतत्कालीन ग्रामविकास अधिकारी डाखरे यांच्या कार्यकाळात न्यायालयातील गाळ उपसणे व फेकणे या कामाकरिता ३ लाख ६९ हजारांचा खर्च झाला. तरी एका ट्रॅक्टर मालकाचे ५० हजार रूपये देणे बाकी आहे. परंतु उपसलेला गाळ मात्र गायब आहे. याची चौकशी करणार, असे सचिव एन. ए. घुटके यांनी सांगितले.
गावातील टिल्लूपंप बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:58 AM
फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षांपासून दर उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होत असताना स्थानिक प्रशासनाने कोणती उपाययोजना केली,.........
ठळक मुद्देवैरागडची ग्रामसभा गाजली : फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईची समस्या