लोकार्पण : नाममात्र आकारले जाणार शुल्क लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेत १ लाख ३० हजार रूपये खर्चुन नवीन शीत शव पेटी खरेदी केली आहे. सदर शीत शव पेटीचे लोकार्पण नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. एक ते दोन दिवस मृतदेह ठेवायचे असल्यास सदर शीत शव पेटी गडचिरोली शहरातील नागरिकांना नाममात्र शुल्क आकारून उपलब्ध करून दिली जाणार आहे. नगर परिषदेने स्वत:च्या फंडातून शीत पेटी खरेदी केली. लोकार्पणाप्रसंगी नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, सभापती गुलाब मडावी, अल्का पोहणकर, आनंद श्रुंगारपवार, केशव निंबोड, नितीन उंदीरवाडे, उपसभापती वैष्णवी नैताम, वर्षा नैताम, प्रवीण वाघरे, रितू कोलते, अनिता विश्रोजवार, लता लाटकर, सतीश विधाते, नीता उंदीरवाडे, रमेश ेचौधरी, भुपेश कुळमेथे, मंजूषा आखाडे, मुक्तेश्वर काटवे, गीता पोटावी, रंजना गेडाम, संजय मेश्राम, पूजा बोबाटे, वर्षा बट्टे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, प्रशांत खोब्रागडे आदी उपस्थित होते. शव पेटी विद्युतवर काम करणारी आहे. नागरिकांच्या मागणीनुसार सदर शव पेटी उपलब्ध करून दिली जाणार आहे व प्रत्येक दिवसानुसार भाडे आकारले जाणार आहे.
नगर परिषदेत शीत शवपेटी उपलब्ध
By admin | Published: June 10, 2017 1:44 AM