लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार संघनिहाय छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा वापर आगामी लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत करण्यात येणार असल्याने नागरिकांनी आणि राजकीय पक्षांनी नवीन मतदार नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाबाबत माहिती देण्याकरीता राजकीय पक्षांची बैठक व पत्रकार परिषदेचे संयुक्त आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते, त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी व्हावी, मतदार यादी जास्तीत जास्त अचुक व्हावी व मतदारांना मतदानविषयक चांगल्या सुविधा देता याव्यात या उद्देशाने जिल्ह्यात विविध कार्यक्र मांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत मतदान केंद्राच्या क्षेत्रात मतदारांची पडताळणी करणे, मतदार केंद्राचे सुसुत्रिकरण करणे, मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे याकरीता नमुना ७ भरणे, नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी नमुना ६ भरणे, त्याचप्रमाणे कायम स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे याकरीता सुध्दा नमुना ७ भरावे लागणार आहे. एकाच मतदार संघातील मतदार यादी भागात स्थलांतरणाकरीता नमुना ८ अ भरावे लागणार आहे.मतदार नोंदणीसाठी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची नेमणूक करु न १ जानेवारी २०१९ ला १८ वर्ष पुर्ण करणारी कोणतीही व्यक्ती मतदार म्हणुन नोंद होण्यापासून वंचित राहणार नाही याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी यावेळी केले.
मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 1:12 AM
येत्या १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार संघनिहाय छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा वापर आगामी लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत करण्यात येणार असल्याने.......
ठळक मुद्देजिल्हाधिकारी शेखर सिंह : लोकसभा-विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू