देसाईगंज : सत्ता परिवर्तन होताच सत्ताधार्यांशी जवळीक साधण्याचा आटोकाट प्रयत्न चालविला आहे़ ज्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी पक्षाविरोधी काम केले, त्या व्यक्तीचे नाव निवडून आलेल्या उमेदवाराच्या बॅनरवर दिसू लागले आहे़ यावरून ‘निवडून आले ते आपले’ या उक्तीचा प्रत्यय येत असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा पक्षाने एकतर्फी विजय मिळविला आहे़ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ज्या कार्यकत्यांनी दुसर्या पक्षाकरिता दिवसरात्र एक करून काम केले ते कार्यकर्ते मतमोजणी होताच विजयी उमेदवाराच्या गोट्यात येऊन बसले आहेत़ आम्ही आपल्याच पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत़ हे दाखविण्यासाठी त्यांनी रस्त्यावर मोठमोठे बॅनर लावले आहेत़ उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची भारतीय संस्कृतीच आहे़ प्रवाहासोबत जाणे हितावह आहे़ सत्ता आणि पैसा हे समीकरण झाले आहे़ म्हणूनच ज्या कार्यकत्यांनी मागील लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत उमेदवाराला पाठ दाखविली होती़ तो उमेदवार विजयी होताच त्याच्यासमोर एकनिष्ठतेचे कवित्व गाऊ लागले आहेत. काही कार्यकत्यांकरिता निवडणूक म्हणजे पैसा कमाविण्याचा मार्ग झाला आहे़ या कार्यकत्यांनी विजयी उमेदवाराच्या गटात स्वत:ला सामावून घेतले आहे़ खुद्द भाजपाच्या एका गटाने भाजपाच्या विरोधात काम केले होते़ मात्र निवडणुकीचा निकाल लागताच त्यांनी विजयी उमेदवाराची कास पकडली आहे़ काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्यांनी देखील भाजपाला जवळ केले आहे़ लोकसभेच्या निकालापूर्वी विरोधी पक्षाचा तिरस्कार करणार्यांनी निकालानंतर सत्ताधार्यांना बॅनरच्या सहाय्याने आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे़ सत्तेत आले ते आपले याचा प्रत्यय संपूर्ण महाराष्टÑात येत आहे. कोण आपला व कोण विरोधातला हे समजणे विजयी उमेदवाराला कठीण झाले आहे. निकालानंतर हातातील झेंड्याचा रंग बदलेला असल्याचे दिसून येत आहे़ (वार्ताहर)
सत्ता परिवर्तनाने हातातील झेंड्याचा रंगही बदलला
By admin | Published: May 20, 2014 11:38 PM