शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

पटसंख्या रोडावली

By admin | Published: August 05, 2014 11:25 PM

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या नियंत्रणात एकात्मिक बकालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत जिल्हाभरात एकूण १ हजार ७७१ अंगणवाड्या तर ५१८ मिनी अंगणवाड्या

कॉन्व्हेंटचा परिणाम : शहरातील अंगणवाड्या पडत आहेत ओसगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या नियंत्रणात एकात्मिक बकालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत जिल्हाभरात एकूण १ हजार ७७१ अंगणवाड्या तर ५१८ मिनी अंगणवाड्या अशा एकूण २ हजार २८९ अंगणवाड्या सुरू आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अंगणवाडीमध्ये मुलांची संख्या समाधानकारक आहे. मात्र शहरी भागातील अंगणवाड्यांमधील मुलांची पटसंख्या रोडावत आहे. यामुळे शहरातील अंगणवाड्या ओस पडत असल्याचे दिसून येते. ० ते ६ वयोगटातील मुलांच्या आरोग्य व आहाराबाबत महिला व बालकल्याण विभाग प्रयत्नशिल आहे. अंगणवाड्यांच्या माध्यमातून सदर विभाग मुलांचा शारीरिक व मानसिक विकास करण्यासाठी विविध योजना राबवित आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाचे केंद्र म्हणून अंगणवाडीला महत्वाचे स्थान आहे. मात्र शासनाने मोठ्या शहरात तसेच तालुक्याच्या ठिकाणी व मोठ्या खेडेगावात इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट शाळांना मान्यता दिली. इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक पालकांनी आपल्या अडीच ते सहा वयोगटातील मुलांना इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटमध्ये दाखल करीत आहे. यामुळे शहरी भागातील अंगणवाडींमध्ये केवळ १५ ते २० मुले पटावर असल्याचे दिसून येते. एटापल्ली तालुक्यात एकूण २२०, भामरागड १३५, अहेरी २५३, कुरखेडा १९१, कोरची १५०, आरमोरी १९१, देसाईगंज ८७, चामोर्शी ३३१, मुलचेरा ११६, धानोरा २९५, गडचिरोली १५२ व सिरोंचा तालुक्यात १६८ अंगणवाडी व मिनी अंगणवाड्या आहेत. ३ ते ५ वर्ष वयोगटातील २ हजार ५९२ मुले, एटापल्ली तालुक्यातील २२० अंगणवाड्यांमधून पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे घेत आहे. याच वयोगटातील भामरागड तालुक्यात १३५ अंगणवाड्यांमधून १ हजार ३४८ मुले पूर्व प्राथमिक शिक्षण घेत आहेत. अहेरी तालुक्यात २५३ अंगणवाड्यांमध्ये एकूण ३ हजार ४११ मुले दाखल आहेत. कुरखेडा तालुक्यात १९१ अंगणवाड्यांमध्ये २ हजार ४५३ मुले दाखल आहेत. सदर आकडेवारी ग्रामीण भागातील आहे. मात्र शहरी भागातील अंगणवाड्यांमधील मुलांची पटसंख्या गेल्या तीन-चार वर्षांपासून कमी होत आहे. शहरी भागातील अंणवाड्यांमध्ये केवळ १५ ते २० मुले दाखल असल्याचे दिसून येते. पटसंख्या वाढण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाची गरज आहे.