शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

ठिकठिकाणी नक्षल्यांच्या पुतळ्यांचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:18 PM

नक्षलवादाविरोधात संताप व्यक्त करत नागरिकांनी ठिकठिकाणी नक्षल्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहण केले. तसेच ठिकठिकाणी नक्षल विरोधी रॅली काढून नक्षल्यांनी ठार केलेल्या नागरिकांचे स्मारक उभारले.

ठळक मुद्देगावातून निघाली रॅली : नक्षलवादाविरोधात नागरिकांनी दिल्या घोषणा, दुसऱ्या दिवशी बाजारपेठ सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलवादाविरोधात संताप व्यक्त करत नागरिकांनी ठिकठिकाणी नक्षल्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहण केले. तसेच ठिकठिकाणी नक्षल विरोधी रॅली काढून नक्षल्यांनी ठार केलेल्या नागरिकांचे स्मारक उभारले.नक्षलवाद्यांतर्फे २८ जुलै ते ३ आॅगस्ट या दरम्यान शहीद नक्षल सप्ताहाचे आयोजन केले आहे. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तामुळे सुरूवातीचे दोन दिवस कोणतीही हिंसक घटना घडली नाही. या उलट नागरिकांनी नक्षल नेत्यांचे पुतळे जाळून नक्षलवादाविरोधात घोषणा दिल्या. अहेरी तालुक्यातील देचलीपेठा येथील नागरिकांनी नक्षल विरोधी रॅली काढली. त्यानंतर नक्षलवाद्याचे प्रतिकात्मक पुतळे जाऊन नक्षलवादी विचारसरणीला उघडपणे विरोध दर्शविला. रॅलीमध्ये विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी नक्षल भगाओ, आदिवासी बचाओ, शासनाची साथ, गावाचा विकास आदी घोषणा दिल्या.अहेरी पोलीस स्टेशनतर्फे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ए. राजा व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनात आलापल्ली येथे नक्षल विरोधी रॅली काढण्यात आली. रॅलीत अहेरीचे पोलीस निरिक्षक सतीश होडगर, सहायक पोलीस निरिक्षक बाळासाहेब शिंदे, हजारे, पीएसआय कनसे, आलापल्लीचे व्यापारी नदीर शेख, अलताफ पठाण, तंमुस अध्यक्ष सुरेश गडमवार, प्राचार्य संजय कोडेलवार, पर्यवेक्षक ताजने यांच्यासह आलापल्ली येथील नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले होते. भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे सुध्दा नक्षल्यांचा पुतळा जाळण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनात बेडगाव येथे नक्षलविरोधी रॅली काढण्यात आली. सदर रॅलीत बेडगाव पोलीस मदत केंद्राचे पीएसआय चेतन ढेकने, नितेश पोटे यांच्यासह गावकरी व शालेय विद्यार्थी सहभागी झाले. नागरिकांच्या मनातील भिती दूर करून गावातील दुकाने उघडावयास लावली.नक्षल सप्ताहाच्या दुसºया दिवशीही वाहतूक ठप्पनक्षल सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीही दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील वाहतूक ठप्प पडली होती. तर नागरिकांनी नक्षल्यांचे पुतळे जाळून नक्षलवादाविरोधात आपला संताप व्यक्त केला. २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षल्यांतर्फे शहीद नक्षल सप्ताहाचे आयोजन केले आहे. या कालावधीत नक्षल्यांकडून हिंसक घटना घडू नये यासाठी पोलीस विभागामार्फत तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मात्र दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांच्या मनामध्ये नक्षल सप्ताहाची भिती असल्याने नक्षल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी दुर्गम भागातील एसटी फेऱ्या व खासगी वाहतूक बंद होती. दुसऱ्या दिवशी वाहतूक सुरळीत होईल, असा अंदाज होता. मात्र दुसऱ्या दिवशीही वाहतूक बंद होती. धान रोवणीच्या कामांना मात्र सुरूवात झाली. पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे पहिले दोन दिवस कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मुरूमगाव परिसरातील खासगी वाहतूक बंद आहे. मात्र एसटी बसेस धानोरा ते मुरूमगाव पर्यंत सुरू आहेत. दुर्गम भागातील फेºया बंद आहेत. मुरूमगाव येथील दुकाने शनिवारीही सुरू होती.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस