लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन २०१४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून गडचिरोली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढलेले डॉ.देवराव होळी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत त्यांची आमदारकी वैध ठरविली आहे. २०१४ ते २०१९ या काळातील डॉ.होळी यांची आमदारकी रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.२०१४ मध्ये सरकारी नोकरीचा त्याग करून डॉ.होळी यांनी भाजपकडून पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढविली होती. यात ते ५० हजाराहून अधिक मताधिक्क्याने विजयी झाले होते. परंतु त्यांचा सरकारी नोकरीचा राजीनामा मंजूर नसतानाही त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली, त्यामुळे त्यांची उमेदवारी अनधिकृत असून त्यांची आमदारकी रद्द करावी याकरिता भाकपचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर २०१७ मध्ये नागपूर खंडपीठाने डॉ.होळी यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्या निर्णयाला होळी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी २०२० रोजी याबाबत अंतिम निर्णय देताना नागपूर खंडपीठाने त्यांची आमदारकी रद्द करण्याबाबत दिलेला निर्णय फेटाळून लावला. शनिवारी (दि.२९) यासंदर्भातील कागदपत्रे डॉ.होळी यांच्याकडे उपलब्ध झाली. त्यांच्या वतीने अॅड.सत्यपाल जैन, सहकारी वकिल गणेश खानझोडे व मनीष शर्मा यांनी काम पाहिले.सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आपली बदनामी करणाऱ्या सर्व विरोधकांना जबर धक्का आहे. आपल्या खºया अर्थाने आज न्याय मिळाला असून या निर्णयामुळे जनतेचा न्यायालयीन प्रक्रि येवरील विश्वास आणखी मजबूत होईल. असत्याची बाजू कितीही बलवान ठरत असली तरी अंतिम विजय हा सत्याचाच होतो.- डॉ.देवराव होळी,आमदार, गडचिरोली मतदार संघ
डॉ.होळी यांना ‘सर्वोच्च’ दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सन २०१४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून गडचिरोली विधानसभा मतदार संघातून निवडणूक ...
डॉ.होळी यांना ‘सर्वोच्च’ दिलासा
ठळक मुद्देसंडे अँकर । आमदारकी ठरविली वैध; नागपूर खंडपीठाचा निर्णय फेटाळला