वडसा वनविभागातील नरभक्षक वाघाचा बंदाेबस्त करावा यासाठी भ्रष्टाचारविराेधी जनआंदाेलन न्यासच्या वतीने मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर १ ते ४ सप्टेंबरपर्यंत ठिय्या व जेलभरो आंदोलन करून मागणी करण्यात आली. परंतु वनविभागाला यात अपयश आले. पुन्हा संतप्त नागरिकांनी १४ सप्टेंबरला ढोल बजाव आंदोलन करून शासन-प्रशासनाचे लक्ष वेधले. तरीही काहीच उपयाेग झाला नाही, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले. देलाेडा येथे मय्यत भीमदेव नागापुरे यांच्या घरी पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन मुलगा नरेंद्र नागापुरे, सून सविता नागापुरे यांचे सांत्वन करून त्यांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी देलोड्याचे उपसरपंच प्रमोद भोयर, भास्कर समर्थ, खुशाल लाडे, जगदीश ढोलणे, जानबा नंदेश्वर, पुरुषोत्तम सहारे, लोभाजी ठाकरे, एकनाथ मशाखेत्री उपस्थित होेते.
नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात ठार झालेले जेप्रा येथील गणपत भांडेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी सुनंदा भांडेकर, मुलगा प्रमोद भांडेकर यांचे सांत्वन पदाधिकाऱ्यांनी केले. तसेच पाच हजार रुपये मदत दिली. यावेळी राज्य समिती विश्वस्त शिवनाथ कुंभारे, समाजसेवक देवाजी तोफा, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, संपर्कप्रमुख योगेश कुडवे, पंडित पुडके, पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर झंजाळ उपस्थित हाेते.