उद्घाटन सोहळ्याला देसाईगंज सहकारी खरेदी विक्री संस्थेचे उपाध्यक्ष अन्नाजी तुपट, संचालक मोरेश्वर दुनेदार, तुकाराम गायकवाड, तुकाराम तित्तीरमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे, माजी पंचायत समिती सभापती मोहन गायगवाड, कोकडी येथील शेतकरी आसिफ गणी शेख, आबाजी राऊत, ज्ञानेश्वर बुल्ले, अनिल राऊत, क्रिष्णा पुस्तोडे, विवेक फुलझेले, सुधीर गायकवाड उपस्थिती होते.
शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर साधारण धान १ हजार ८६८ रुपये व ग्रेड ए चे धान १ हजार ८८८ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत भात खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ,असे आवाहन देसाईगंज सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे. ७ जून पासून या केंद्रावर नियमित भात खरेदी केली जाणार आहे.