पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : अनुदानापासून शेतकरी वंचित राहात असल्याचा आरोप गडचिरोली : काँग्रेसच्या बुथ कमिटी निवडणुकीच्या नियोजनाबाबत २ मे रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची सभा माजी आमदार तथा काँग्रेसेच जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित करण्यात आली. या सभेत सरकारच्या धोरणावर टीका करण्यात आली. या सभेला जिल्हा परिषद सदस्य अॅड. रामभाऊ मेश्रराम, मनोहर पोरेटी, रवींद्रनाथ शहा, पंचायत समिती सभापती दुर्लभा बांबोळे, नगरसेवक सतीश विधाते, पं. स. सदस्य मालता मडावी, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर उपस्थित होते. सिंचन विहिरी तसेच कुंपनासाठी अनुदान मिळविण्याकरिता शेतकऱ्यांना सुरुवातीला १० टक्के रक्कम जमा करण्यास सांगितले जात आहे. त्यानंतरच अनुदानाची रक्कम दिली जात आहे. शेतकरी अनुदानाची रक्कम भरू शकत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. डॉ. नामदेव उसेंडी आमदार असताना चिचडोह, हळदीपुराणी उपसासिंचन योजना मंजूर करण्यात आली. सध्याचे सरकार मात्र केवळ देखावा करीत आहे, असा आरोप करण्यात आला. यावेळी राजेश ठाकूर, सुरेश भांडेकर, पी. टी. मसराम, अॅड. बाबासाहेब आखाडे, हेमंत भांडेकर, हरबाजी मोरे, लालाजी उंदीरवाडे, कुलदीप इंदुरकर, मिलींद किरंगे, भुपेंद्र भैसारे, निशांत नैताम, प्रवीण दासरवार उपस्थित होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करायची असल्याने बुथ कमिट्या स्थापन केल्या जाणार आहेत. बुथ कमिटीच्या मतदानासाठी पक्षाचे सभासद होणे गरजेचे आहे. प्रत्येक बुथवरून एक बुथ अध्यक्ष निवडला जाईल. बुथ अध्यक्षांमधून एक ब्लॉक अध्यक्ष निवडला जाईल. सहा जिल्हा प्रतिनिधी व प्रदेश प्रतिनिधी हे जिल्हा कमिटीचे मतदार राहतील. या निवडणुकीच्या नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व बुथ कमिट्या १० मे च्या आत स्थापन करणे गरजेचे राहणार आहे.