गडचिराेली : ज्या-ज्या वेळी शिक्षकांवर शासनामार्फत अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्या-त्या वेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संघटना शिक्षकांच्या मदतीला धावून गेली आहे. प्राथमिक शिक्षक समितीचा इतिहास अतिशय संघर्षमय आहे. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी, यासाठी लढा दिला जात आहे. उद्दिष्ट साध्य हाेईपर्यंत हा लढा चालूच राहील, असा विश्वास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची संवाद सभा गडचिराेली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात १८ जानेवारी राेजी पार पडली. याप्रसंगी उदय शिंदे मार्गदर्शन करीत हाेते.
संवाद सभेला मुख्य मार्गदर्शक म्हणून शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय काेंबे, राज्य उपाध्यक्ष राजन काेरगावकर, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजकुमार घाेडेस्वार, याेगेश वाढई, राेशनी राखडे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, चक्रपाणी कन्नाके, देवेंद्र डाेहणे, नरेश काेत्तावार, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सरचिटणीस बापू मुनघाटे, प्रदीप भुरसे आदी मान्यवर उपस्थित हाेते. विजय काेबे यांनी मार्गदर्शन करताना शिक्षकांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्यासाठी शिक्षक समितीच्या छत्राखाली संघटित हाेण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांनी केले. संचालन रमेश रामटेके यांनी केले. महिला आघाडी प्रमुख वैशाली काेसे यांनी आभार मानले. सभेसाठी गणेश काटेंगे, डंबाजी पेंदाम, राजेश बाळराजे, खिरेंद्र बांबाेळे, आनंदराव ठाकरे, दीपक घाेडमारे, सचिन मेश्राम, राजेंद्र भुरसे, गणेश मडावी, रवी मुलकलवार उपस्थित हाेते.
बाॅक्स ...
या मुद्द्यांवर झाली चर्चा
सभेदरम्यान एकस्तर वरिष्ठ वेतन श्रेणी चटाेपाध्याय, प्राेत्साहनभत्ता, शिक्षक संवर्गाची रिक्त पदे, मुलींचा दैनिक उपस्थिती भत्ता, २०२१ मधील बदली धाेरण, शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांसाठी सुविधा पुरविणे, प्रत्येक कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन मिळण्यासाठी लढा देणे आदी मुद्द्यांवर चर्चा झाली.