लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास त्याची तक्रार तत्काळ सायबर सेलकडे केल्यास पाेलीस यंत्रणा कामाला लागते. त्यामुळे पैसे परत मिळू शकतात. ऑनलाईन फसवणूक करणारे विविध क्लुप्त्यांचा वापर करून नागरिकांच्या बँक खात्यामधील पैसे ऑनलाईन गहाळ करतात. प्रत्येकाच्या बँक खात्याला माेबाईल क्रमांक जाेडला आहे. त्यामुळे खात्यात पैसे जमा हाेणे व पैसे कपात हाेणे याचा संदेश माेबाईलवर पाठविला जाते. आपल्या खात्यातील पैसे गहाळ हाेताच तसा मेसेज माेबाईलवर येतो. पैसे गहाळ झाल्याचे लक्षात येताच सायबर सेलशी संपर्क साधल्यास त्याचे पैसे परत मिळू शकतात.
ऑनलाईन व्यवहार जपून कराबहुतांश नागरिक ऑनलाईन व्यवहार करतात. हे व्यवहार करताना पुरेशी काळजी घेण्याची गरज आहे. पीनकाेड, सीव्हीव्ही नंबर जपून ठेवावा. माेबाईल लाॅक करून ठेवावा.
जेवढी तक्रार लवकर तेवढे पैसे मिळण्याची शक्यता वाढते
पैसे गहाळ झाल्याचा संदेश प्राप्त हाेताच याबाबत तत्काळ सायबर सेलशी संपर्क साधल्यास सायबर सेलची यंत्रणा कामाला लागते. त्यामुळे फसवणूक हाेताच तत्काळ तक्रार करण्याची गरज आहे.
संबंधित व्यक्तीने रक्कम विड्राॅल केली नसल्यास किंवा तिसऱ्या खात्यात वळती केली नसल्यास संबंधित खात्याचे आर्थिक व्यवहार गाेठवून पैसे विड्राॅल करणे थांबविता येते. याबाबत बँकेशी संपर्क साधला जातो.
गुगल पे, फाेन पे, पेटीएम यासारख्या ई-वाॅलेटच्या माध्यमातून पैसे गहाळ झाले असल्यास संबंधित कंपन्यांना फाेन करून कळविता येते. संबंधित कंपनी तत्काळ कारवाई करते.
आर्थिक फसवणुकीची तक्रार जेवढी लवकर केली जाते तेवढे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. तक्रार प्राप्त हाेताच सायबर सेलची यंत्रणा कामाला लागते. वरिष्ठ स्तरावर कळविले जाते. ज्या खात्यात पैसे झाले आहेत त्या खात्याचे आर्थिक व्यवहार गाेठविले जातात. त्यामुळे पैसे त्याच ठिकाणी राहतात. बऱ्याचवेळा आपल्या खात्यातून जरी पैसे कपात झाले तरी दुसऱ्या खात्यात जमा हाेण्यास वेळ लागते. अशावेळी ट्रान्सफर हाेणारे पैसे थांबविता येतात. - कुंदन गावडे, ठाणेदार, पाेलीस स्टेशन आष्टी.
या क्रमांकावर करा फाेन
आर्थिक फसवणुकींना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र सायबर सेलची शाखा कार्यरत आहे. ९४२२१५१००१ हा सायबर सेलचा माेबाईल क्रमांक आहे. एखाद्या व्यक्तीची तक्रार प्राप्त हाेताच सायबर यंत्रणा कामाला लागते. जवळपासच्या पाेलीस स्टेशनशी संपर्क साधण्यापेक्षा थेट या क्रमांकावर फाेन करावा.